💥घरो घरी तिरंगा अभियानात सहभागी होवून 13 ते 15 ऑगस्ट आपल्या घरावर तिरंगा फडकवावा - जिल्हाधिकारी गोयल


💥स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव : परभणी जिल्ह्यातील  जनतेने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून 💥

परभणी (दि.12 आगस्ट) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अर्थात “घरो घरी तिरंगा” हे अभियान संपूर्ण देशात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या  स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान या निमित्ताने जपला जाणार आहे. जिल्ह्यातील जनतेने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

* ध्वजसंहितेचे पालन करावे :-

            तिरंगा फडकवत असताना ध्वजसंहितेचे प्रत्येक नागरिकाने काटोकोर पालन करावे. दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज सन्मानपूर्वक फडकविला जाईल याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय ध्वज हाताने कातलेला, हाताने बनविलेला किंवा मशीनव्दारे तयार केलेल्या सुत/ पॉलिस्टर/लोकर/सिल्क व खादी कापडापासून तयार केलेला असावा. राष्ट्रीय ध्वजाचा आकार आयताकृती असेल व झेंड्याची लांबी व रुंदी किमान 3:2 या प्रमाणात असावी. शासनाच्या सुचनेनुसार राष्ट्रीय ध्वज दि. 13 ते 15 ऑगस्ट हे 3 दिवस घरोघरी फडकवितांना दररोज सायंकाळी खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिताचे पालन करावे लागेल. राष्ट्रीय ध्वज फडकवितांना केशरी रंग आकाशाकडे वर असावा तर हिरवा रंग जमिनीच्या दिशेने खाली असावा. राष्ट्रीय ध्वजाच्या दोन्ही बाजूस समान पांढऱ्या पट्टीच्या पूर्णतः मध्यभागी २४ आ-यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्र दिसेल, असा ध्वज असावा.

            राष्ट्रीय ध्वजावर कोणतेही प्रकारचे अक्षर लिहू नये व ध्वजाचा "केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावू नये. राष्ट्रीय ध्वज जाणूनबुजून जमीनीवर अथवा पाण्यात पडणार नाही याबाबत दक्षता / काळजी घ्यावी. खराब झालेला, फाटलेला, मळलेला व चुरगळलेला ध्वज फडकवू नये.  राष्ट्रीय ध्वजाच्यावर किंवा समान स्तरावर कोणताही पताका, बोधचिन्ह,फुलांचा हार व इतर ध्वज एकाच काठीवर लावता येणार नाही. राष्ट्रीय ध्वज फाटेल अशा पद्धतीने लावू अथवा बांधू नये. राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज लावू नये. राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. जिल्हयातील सर्व जनतेने “घरो घरी तिरंगा” या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन आंचल गोयल यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या