💥जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकऱ्याची कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या....!


💥मयत शेतकऱ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 70 हजार रुपये तर तुळजाभवानी अर्बन बँकेची 2 लाख रुपये कर्ज होते💥 

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी मनोज गणेशराव देशमुख वय 40 वर्षे या शेतकऱ्यांने  कर्ज ला कंटाळून गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कौसडी येथील मनोज गणेश राव देशमुख यांना पाच एकर शेती असून त्यांच्याकडे बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 70 हजार रुपये तर तुळजाभवानी अर्बन बँकेची दोन लाख रुपये कर्ज होते सतत नापिकी कर्ज कसे फेडावे या चिंतेत मनोज गणेशराव देशमुख यांनी स्वतःचे शेतात सकाळी नऊ वाजता झाडाला गळफास  घेऊन आत्महत्या केली याबाब मयताचे  वडील गणेश राव देशमुख यांनी बोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून बोरी पोलीस ठाण्याची  सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे बीट जामदार शेख रफिक पो काँ  गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक पंचनामा केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या