💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या न्यायालयीन लढाईला यश : धार रोडवरील अनाधिकृत कचरा डेपो बंद....!


💥प्रहारच्या वतीने फटाके फोडून विजयोत्सव साजरा💥


परभणी : मागील १२ ते १५ वर्षापासून परभणी शहरातील मध्यवस्तीतील धार रोडवरील सुरु असलोना परभणी शहर महानगरपालिकेचा अनाधिकृत कचरा डेपो प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राष्ट्रीय हरीत लवाद न्याय प्राधिकरण न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेच्या निकालामुळे बंद करण्यात आला असून हा अनाधिकृत कचरा डेपो बंद व्हावा म्हणून मागील अनेक वर्षापासून परिसरातील नागरीकांनी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत प्रहार जनशको पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात कचरा फेको आंदोलन करण्यात आले शिवाय महानगरपालिकेच्या विरोधात अनधिकृत कचरा डेपोवर ही आंदोलन करण्यात आले होते. आंदोलन करुन ही जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच कार्यवाही करीत नाही उलट अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय सुरु होते. महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १० वर्षांपूर्वीच बोरखंड खुर्द येथे कचरा डेपोसाठी परवानगी दिली असतानाही हि धार रोडवरील अनाधिकृत कचरा डेपो बिनदिक्कतपणे चालू होता. जिल्हा प्रशासन, परभणी शहर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात धार रोडवरील करा डेपो तात्काळ हटविण्यात यावा या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी राष्ट्रीय हरित लवाद न्याय प्राधिकरण न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या खटल्याच्या पहिल्याच सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने धार रोडवरील कचरा डेपो अनाधिकृत असुन कचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ चे उल्लंघन करणारे आहे करीता संबंधीत कचरा डेपो तीन महिन्याच्या आत बंद करुन बोरखंड खुर्द येथे स्थलांतरीत करण्यात यावा असा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला होता. न्यायालयाच्या या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई कार्यालयात सुनावणी घेण्यात आली यात मा. जिल्हाधिकारी परभणी व मा. आयुक्त परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांना १ जुलै २०२२ पर्यंत धाररोडवरील अनाधिकृत कचरा डेपो बंद करून बोरखंड खुर्द येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दि . ०१ जुलै २०२२ पासून महानगरपालिकेच्या वतीने धार रोडवरील अनाधिकृत कचरा डेपो बंद करण्यात आला असून हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या न्यायालयीन लढाईचे आहे. करीता परिसरातील नागरीकांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार माणण्यात आले आहे. आज रोजी प्रहार जनशक्तीच्या वतीने धार रोड वरील कचरा डेपो येथे फटाके फोडुन व पेढे वाटुन विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख सय्यद मुस्तफा, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमु, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्जराव काळे, गजानन कदम, अनित पडोळे, शेख अमजद, सय्यद समीर, सय्यद रफिक, सुरेश काळे, किशन काळे, सय्यद आरमान, शेख नादान व परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या