💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे जनहीतवादी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडून महिनाभर मोफत दोन बसेस...!


💥तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी भाविकांच्या सेवेत केली आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंनी बसेसची व्यवस्था💥


गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे संवेदनशील व कर्तव्यदक्ष आ.डॉ. रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या वतीने  शहरासह तालुक्याचे जागृत देवस्थान असलेल्या श्री.मन्नाथ दर्शनासाठी आज पासून महिनाभर भाविकांसाठी दोन बसेस मोफत सुरू करण्यात आल्या आहेत.त्यांचा आज शहरातून शुभारंभ झाला. कोरोनातील अपवाद वगळता गेल्या १० वर्षापासून आमदार साहेबांच्या वतीने भाविकांच्या सेवेची ही परंपरा कायम ठेवण्यात आली.

      तालुक्यातील मरगळवाडी येथे गंगाखेडसह तालुक्याचे जागृत देवस्थान असलेले मन्नाथ मंदिर आहे. श्रावणमासात महिनाभर येथे भाविकांची पहाटे ५ वाजेपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते. दररोज सुमारे ४ ते ५ हजार भाविक दर्शनासाठी येतात. शहरातील वयोवृद्ध, अपंग, महिला, सर्व नागरिकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठलाही त्रास होऊ नये म्हणून  दोन मोफत बसेसची सुविधा देण्यात आली आहे. तसेच दर श्रावण सोमवारी भाविकांना नाश्त्यासह पाण्याची व्यवस्थाही त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. शहरातील दत्त मंदिर ते दिलकश चौक मार्गे मन्नाथ मंदिर तसेच श्री संत जनाबाई मंदिर ते दिलकश चौक मार्गे मन्नाथ मंदिर अशा दोन बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविक भक्तांनी या सुविधेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

          यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, माजी सभापती मुंजाराम मुंडे, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, बाबाजी पोले, धारखेडचे सरपंच उद्धवराव चोरघडे, महेश शेटे, वैजनाथ टोले, कवी विठ्ठल सातपुते यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या