💥पाथरी येथील स्व नितीन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.डॉ.सुरेशराव सामाले यांची निवड....!


💥संस्थेचे सचिव कुनालराव लहाने यांनी लेखी पत्राव्दारे केली निवड💥

✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.२१ जुलै) :- येथील स्व नितीन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेशराव सामाले यांची निवड संस्थेचे सचिव कुनालराव लहाने यांनी लेखी पत्राव्दारे गुरूवार २१ जुलै रोजी केली.

या वेळी महाविद्यालयात प्राचार्य डॉ आर एस फुन्ने यांनी प्रा डॉ सुरेश सामाले यांचा शाल आणि वृक्ष रोपटे देऊन सन्मान केला. या वेळी प्रा डॉ जगन्नाथ बोचरे,प्रा डॉ साहेब राठोड,प्रा डॉ मारोती खेडेकर,प्रा डॉ आनंद इंजेगावकर,प्रा डॉ अर्चना बदने,प्रा डॉ शितल गायकवाड,डॉ शारदा पवार, प्रा डॉ मधुकर ठोंबरे,प्रा डॉ अंकूश सोळंके,प्रा डॉ हनुमान मुसळे,प्रा तुळशीदस काळे,प्रा रंणजित गायके,प्रा डॉ हरी काळे आदी प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहुन प्रा डॉ सामाले यांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या