💥हिंगोलीत ढगफुटीसदृश्य पाऊस नदीला पूर आल्याने अनेक गावे पाण्याखाली💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात नदीचे पाणी घुसले आहे अनेक गुरे .वाहून गेली .वाहने वाहून गेली तर सकाळी सात वाजे पर्यन्त गाव पाण्याखालीच होते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावाजवळून आसना नदी वाहते या नदीला संरक्षण भिंत आणखी उंचीची करण्याची मागणी होत आहे मात्र ती काही झाली नाही गावात पुराचे पाणी शिरण्याचा प्रकार घडतो मात्र प्रशासनाने याकडेलक्ष द्यायला तयार नाही या आधी देखिल 2016 मधे कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते तेव्हा करोडो रुपयांची हाणी झाली होती या वेळी देखिल अशीच परिस्थिती निर्माण झाली होती अनेकांची गुरे वाहून गेली होती अनेकांची घरे पडली होती शेतातील पिके देखिल वाहून गेले होते काहींचे वाहने वाहून गेली होती आज देखिल तीच परिस्थिती उद्भवली आहे
हिंगोली जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलेलं आहे. तसंच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली असून आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीच्या जवळ असणारं कुरुंदा गाव पाण्याखाली गेलं आहे. रात्रभर पडलेल्या पावसाने नदीपात्रातून पाणी थेट गावात शिरले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या संसार उपयोगी साहित्याचे मोठं नुकसान झालं आहे.
कुरुंदा गावाच्या परिसरात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर रात्रभर कायम राहिल्याने सकाळपर्यंत आसना नदीला पूर आला. या पावसामुळे विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही बाधित झाले. या पुराचा फटका आसना नदीकाठच्या अनेक गावांना बसला आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पूरग्रस्त गावांमध्ये प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.....
0 टिप्पण्या