💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा💥
परभणी - शहरातील आम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या अहिल्याबाई होळकर नगर हे मागच्या २५ वर्षापूर्वी वसलेली कॉलनी असुन येथील सर्व प्लॉटिंग एन.ए.ले. आऊट झालेले आहेत या परिसरातील नागरीकांनी मालमत्तेचे बेटरमेंट चार्जेस व नियमित घरपट्टी भरत असताना देखील अहिल्याबाई होळकर नगरातील रस्त्यांनी व गटारांची अवस्था दयनीय आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना परभणी शहर महानगरपालिकेने नागरी सुविधा पुरविणे बंधनकारक आहे परंतु महानगर पालिका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
काल दिनांक २७ जूलै २०२२ रोजी अहिल्याबाई होळकर नगरातील नागरीकांनी तेथील रस्ते व गटारांची दुरावस्था पाहण्यासाठी व याबाबत न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविले होते. तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर असुन या नगरातील गटारे तुडुंब भरुन रस्त्यावरुन गटाराचे पाणी वाहत आहे शिवाय पक्के रस्ते न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून या चिखलमय रस्त्यातून नागरिकांना आपला रस्ता शोधावा लागत आहे शिवाय या भागामध्ये घंटागाडी देखील मागील सहा महिन्यापासून येत नाही. तुंबलेली गटारे व परिसरातील घाणीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी परसली असून पावसाळा चालु असल्याने साथीच्या आजाराचा मोठा धोका निर्माण आहे. अहिल्याबाई होळकर नगरातील नागरीकांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे याबाबत लेखी तक्रार दिली असुन नागरी सुविधा पुरविणे बाबत शहर महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन न्याय मिळुन देणे बाबत विनंती केली होती या तक्रारीची तत्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिकांच्या शिष्टमंडळासह आज परभणी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले
निवेदनात अहिल्याबाई होळकर नगरातील कच्चा रस्त्यांवर तात्काळ मुरुम टाकुन रस्ते व्यवस्थीत करावे, नगरातील गटारांची तात्काळ साफसफाई करुन ही साफसफाई नियिमत चालू ठेवावी, परिसरातील नागरीकांना मनपा ने पाईपलाईन टाकुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे व परिसरात नियमित घंटागाडी सुरु करुन प्रत्येक घरातील कचरा संकलित करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आलेल्या आहेत.
मागण्या तात्काळ मान्य करून परभणी शहर महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर नगरातील मालमत्ता कर भरणा करणाऱ्या नागरीकांना न्याय द्यावा अन्यथा परभणी शहर महानगरपालिका प्रशासन विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष व अहिल्याबाई होळकर नगरातील नागरीकांच्या वतीने जनआंदोलन उभे केले जाईल व या आंदोलनाच्या वेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल याची नोंद असे हि या निवेदानात म्हटले आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर, सय्यद अरमान, दीपक कुचे, गोदावरी दीपके, मिनाबाई जाधव, जयश्री पारवे, शामलबाई सदावर्ते, धृपदाबाई खिल्लारे, प्रजा तुरुकमाने, अनुराधा थोरात, अर्चना मुनेश्वर, कौशल्या कळसे, छाया खांडके इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....
0 टिप्पण्या