💥हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही बेकायदेशिररित्या पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस अटक...!


💥०२ गावठी बनावटीचे पिस्टल व १० जिवंत काडतुसे जप्त💥


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली : स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथकास आज रोजी गुप्त बातमीदारा मार्फेत बातमी मिळाली की इंन्टरसिटी एक्सप्रेसने एक शिकलकरी इसम नामे यशपालसिंग उर्फे करतारसिंग पिता काजलसिंग जुनी हा अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री करतो व तो अग्नीशस्त्र घेवुन तो परभणी येथे त्याचे नातेवाईकाला भेटण्यासाठी जात आहे व बडेरा कॉम्प्लेक्स हिंगोली येथे येणार आहे अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक साहेबांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथकाने सदर परीसरात गोपनीय पध्दतीने सापळा रचुन रेल्वे स्टेशनकडुन बडेरा कॉम्लॉक्स कडे येत असताना सदर इसम यशपालसिंग उर्फ करतारसिंग पिता काजल सिंग जुनी वय २० वर्षे रा . निमखेडी ता.सग्रामपुर जि.बुलढाणा यास शिताफीने त्याव्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कमरेला बेकायदेशिररित्या ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व खिशात १० जिंवत काडतुस ज्याची एकुण किंमत ९ ०,००० रू . मिळुन आले . सदर मुददेमाल पोलीसांनी जप्त केले असुन नमुद आरोपींवर पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर,सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . उदय खंडेराय , सहा . पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार , सहा . पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु , पोलीस अंमलदार भगवान आहे , शेख शकील , विशाल घोळवे , राजुसिंग ठाकुर , किशोर कातकडे , शंकर ठोंबरे , ज्ञानेश्वर सावळे , किशोर सांवत , विठल काळे , आकाश टापरे , प्रशांत वाघमारे यांनी केली..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या