💥नांदेड येथील नवा मोंढा परिसरात मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी तयार...!


💥वसतीगृहाचे सुरू केलेले पाच मजली बांधकाम आता पूर्ण झाले असून प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात करण्यात येणार💥 

नांदेड (दि.१८ जुलै) : मराठा समाजातील गरीब व होतकरू मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून मराठा सेवा संघ नांदेडच्या पुढा‌काराने व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने नवा मोंढा नांदेड येथील वसतीगृहाचे सुरू केलेले पाच मजली बांधकाम आता पूर्ण झाले असून प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील हुशार, गरीब व होतकरू मुलींना दहावीनंतर पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नांदेड सारख्या ठिकाणी राहून पुढील शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेता येत नव्हते तसेच ग्रामीण भागातील मुली शहरात राहतांना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न येत होता म्हणून पालक आपल्या मुली विषयी चिंतातूर होते परंतू आता या बाबींची चिंता करण्याची गरज राहीली नाही समाजातील विविध स्तरांतील दानशूर व समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीनी सदर वसतीगृह बांधकामासाठी पन्नास रुपयापासून ते पाच लक्ष रूपये पर्यंत सढळ हाताने मदत केली आहे.वास्तूचे बांधकाम अतिशय देखणे व दर्जेदार झाले आहे.वसतीगृह बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत उच्च दर्जाचे वापरण्यात आले आहे.त्यामुळे वसतीगृहात राहणाऱ्या मुलींना अत्यंत दर्जेदार वास्तूमध्ये राहत असल्याचा अनुभव येणार आहे.वसतीगृहाची क्षमता शंभर मुलींची असून वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजू मुलींनी https://forms.gle/4zakX1Rr7L8tLpXQ8 या गुगल लिंकवर जावून मोबाईल वरून किंवा नेटकॅफेवरून आॅनलाईन फाॅर्म पूर्णपणे भरावा प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर होणार असून प्रवेश निश्चित झाल्यानंतर नाममात्र फिस आकारली जाणार आहे.असे आवाहन प्रवेश प्रक्रिया समिती व  मराठा सेवा संघ नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या