💥गंगाखेड तालुका कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रपतींना साकडे....!


🔹ईडी कारवाईत हस्तक्षेपाची मागणी 🔹

गंगाखेड : दिल्ली पासून गल्ली पर्यंत केंद्रीय यंत्रणांचा खुलेआम गैरवापर सुरू आहे. हा विरोधीपक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून तो थांबवण्यासाठी गंगाखेड तालुका व शहर कॉंग्रेसने थेट राष्ट्रपतींना साकडे घातले आहे. या संदर्भात आज गंगाखेड तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच चौकशी करण्यात आली. आता राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज सलग तीसऱ्या दिवशी ईडी कडून चौकशी सुरू आहे.  हा विरोधीपक्षांना घाबरवण्याचा प्रकार असून तो थांबवण्याबाबत राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, ॲड हनुमंत जाधव, शहराध्यक्ष शेख युनूस, युवक कॉंग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष नागेश डमरे, विधानसभा सरचिटणीस सिद्धार्थ भालेराव, गणेश शिंदे, शिवाजी घोबाळे, श्रीकांत बेद्रे, शेख नसीर, सय्यद अजीम, यकीन खान कट्टू खान, शेख अखिल, शेख अज्जू आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ऊपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या