💥चित्रपटातील कलाकारांनी जिंतूरकरांना 'ठेच चित्रपट' पाहण्याचे केले आव्हान....!

 


💥निर्माते, कलाकार यांनी घेतली पत्रकार परिषद💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा प्रेमाचा मर्मस्पर्शी त्रिकोण तथा हुंडावळीच्या सामाजिक समस्यावर संदेश देणारा ग्रामीण बोलीभाषेतील अस्सल जिंतूरकरांचा मराठी चित्रपट ठेच चित्रपट येत्या १५ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे. त्या संदर्भात निर्माते व कलाकारांनी पत्रकार परिषदे घेऊन माहिती दिली. 

       तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तूत ठेच चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लवीला प्रपोज करतो परंतु हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला  मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्रासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे नव्या दमाचे कलाकार, दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत टीजर आणि ट्रोलरमुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून येत्या १५ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेस निर्माते शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, कैलास थिटे, सय्यद नूर, श्रीराम वांढेकर, कलाकार गजानन टाके, हर्षाली साळुंखे, शितल  वाव्हळे, अक्षय वाघमारे, राजेंद्र जाधव दिगदर्शक ठेच या चित्रपटाचे ग्रामीण भागातील विविध ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून चित्रपट कसा दर्जेदार होईल यासाठी सर्व टीमने मेहनतीने काम केले आहेत हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास गजानन टाके कलाकार यांनी यावेळी बोलतांना केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या