💥धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त धर्मापुरी पंचायत समिती गणात समाजोपयोगी उपक्रम - माधव मुंडे


💥कोरोनवरील बुस्टर डोस, सर्वरोग तपासणी ,वृक्षारोपण आदी उपक्रम💥

परळी वैजनाथ (दि.१४ जुलै) :- माजी सामाजिक न्याय मंत्री, बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी तालुक्यातील धर्मापुरी पंचायत समिती गणात  १५ जुलै रोजी विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांनी दिली आहे. 

       महाराष्ट्र राज्यातील एक वजनदार माजी मंत्री व जनसामान्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारा नेता म्हणजे ना.धनंजय मुंडे, आपल्या कर्तृत्व, दातृत्व व वक्तृत्व याचा संगम म्हणजे धनुभाऊ. दिव्यांगाचे प्रश्न सोडवुन त्यांनी नवा आयाम निर्माण केला आहे.आरोग्याच्या बाबतीत व कोरोनाकाळात त्यांनी केलेले काम एकमेवाद्वितीय आहे. राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सह्या मंत्री धनंजय मुंडे  यांचा १५ जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये लसीकरण (पहिला, दुसरा व बूस्टर डोस), वृक्षारोपण, सर्व मोफत आरोग्य रोगनिदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी तालुक्यातील धर्मापुरी पंचायत समिती गणातील  नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हा सरचिटणीस माधव मुंडे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या