💥गंगाखेड नगर परिषद प्रशासना कडून गाळ काढायचा सोडून ब्लिचिंग पावडर,तुरटी टाकून पाणीपुरवठा....!


💥उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश💥 

गंगाखेड -प्रतिनिधी

गोदावरी पात्रातून शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत गाळ झाला असून ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून शहरवासीयांना पाणीपुरवठा करत असल्याची कबुली नगरपालिकेने निवेदन करते आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे  दिली.

सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गंगाखेड नगरपालिके कडून शहर वासियांना गढुळ व दूषित पाणीपुरवठा केला जात असून स्वच्छ पाणीपुरवठा साठी नगरपालिकेला आदेशित करावे अशी लेखी विनंती पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना पाच जुलै रोजी केली होती. या पत्रावर उपविभागीय अधिकाऱ्याने कार्यालयाने नगरपालिकेला लेखी पत्र व्यवहार करून या पत्रानुसार तात्काळ कार्यवाही करून कार्यालयास अहवाल सादर करावा अशी आदेशित करण्यात आले होते. यानुसार नगरपालिका कार्यालयाने 14 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी व निवेदनकर्ते आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना लेखी प्रतिउत्तर पाठवले. मुळी बंधारा गोदावरी पात्र पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत जीर्ण अवस्थेत आहे. तरी गोदावरी पात्रातील पाण्याची टाकी येथून ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून दैनंदिन पाणीपुरवठा केला जात आहे. जॅकवेल व पाण्याच्या टाकीमधून गाळ काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम कार्यालयाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. एकूण या पत्राद्वारे आजपर्यंत नगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना गाळयुक्त पाणीपुरवठा केल्याची कबुलीच नगरपालिकेने दिली आहे. एकूणच आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी अवस्था नगरपालिकेची झालेली आहे. गाळ पाण्याच्या टाकीत झाला असताना तो गाळ काढण्या ऐवजी त्या टाकीत ब्लिचिंग पावडर आणि तुरटी टाकून तसाच पाणीपुरवठा मागील चार महिन्यापासून केला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टाकीतील गाळ काढणे सोपे असतानाही नगरपालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. एकूणच पिण्याचा पाणीपुरवठा करण्यावरील खर्च वाढवून गुत्तेदाराचे भले करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने चालवला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या