💥परभणी जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर : जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' : अनेक इच्छुकांची समिकरणे बदलणार...!


💥निवडणूक विभागाने आरक्षण केले जाहीर💥 

परभणी (दि.28 जुलै) :  परभणी जिल्हा परिषदेंतर्गत गटांचे आरक्षण आज गुरुवार दि.28 जुलै 2022 रोजी सोडत पध्दतीने निश्‍चित करण्यात आले आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या एका बैठकीतून गटातील आरक्षण सोडत पध्दतीने निश्‍चित करण्यात आले. निवडणूक विभागाने ते आरक्षण जाहीर केले आहे.


* जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील आरक्षण :-

         बझुर बु. जिल्हा परिषद गट सर्वसाधारण, सावंगी म्हाळसा-सर्वसाधारण महिला, वाघी धानोरा-अनुसूचित जाती, आडगाव बाजार-सर्वसाधारण महिला, भोगाव-अनूसूचित जाती महिला, पुंगळा - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, वरुड-अनुसूचित जमाती महिला, चारठाणा-सर्वसाधारण, बोरी-अनुसूचित जाती, वस्सा - नागरीकांचा मागास प्रवर्ग व कौसडी - सर्वसाधारण, असे आहे.

* परभणी तालुका गटांचे आरक्षण :-

        जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे - परभणी तालुक्यातील झरी गट नागरीकांचा मागास प्रवर्ग, टाकळी बोबडे-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, असोला-सर्वसाधारण महिला, टाकळी कु. -सर्वसाधारण महिला, पेडगाव-सर्वसाधारण, जांब-अनुसूचित जाती, सिंगणापूर-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, पिंगळी-सर्वसाधारण महिला, लोहगाव-अनुसूचित जाती महिला, पोखर्णी-सर्वसाधारण महिला, दैठणा-सर्वसाधारण...

* मानवत तालुका गटांचे आरक्षण :-

        कोल्हा-सर्वसाधारण, ताडबोरगाव-सर्वसाधारण, केकरजवळा-सर्वसाधारण महिला, रामपुरी बु. - नागरीकांचा मागास प्रवर्ग.

* सेलू तालुका गटाचे आरक्षण :-

         चिखलठाणा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, वालूर-सर्वसाधारण महिला, कुपटा-सर्वसाधारण, हादगाव खु.-सर्वसाधारण महिला, रवळगाव-सर्वसाधारण महिला, देऊळगाव गात-सर्वसाधारण महिला.

* पाथरी तालुका गटाचे आरक्षण

        हादगाव बु.-सर्वसाधारण, देवनांद्रा-सर्वसाधारण, कासापूरी-अनुसूचित जाती महिला, बाभूळगाव-सर्वसाधारण, लिंबा-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला.

* सोनपेठ तालुका गटाचे आरक्षण :-

        शेळगाव महाविष्णू-सर्वसाधारण, नरवाडी-नागरीकांचा मागास प्रवर्ग, डिघोळ-सर्वसाधारण महिला, उखळी बु.-सर्वसाधारण महिला.

* पूर्णा तालुका गटाचे आरक्षण :- 

       एरंडेश्‍वर-सर्वसाधारण महिला, चुडावा-सर्वसाधारण महिला, कावलगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, गौर- सर्वसाधारण, कानडखेड-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ताडकळस-सर्वसाधारण, वझूर-नागरीकांचा मागास प्रवर्ग.

* पालम तालुक्याती गटाचे आरक्षण :-

       रावराजूर-सर्वसाधारण, पेठशिवणी-सर्वसाधारण महिला, पेठपिंपळगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, चाटोरी-नागरीकांचा मागास प्रवर्ग, बनवस - अनूसूचित जमाती.

* गंगाखेड तालुका गटाचे आरक्षण :-

        धारासूर-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, महातपूरी-अनूसूचित जाती महिला, मरडसगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग, इसाद-अनूसूचित जाती, गुंजेगाव-सर्वसाधारण, कोद्री-सर्वसाधारण व राणी सावरगाव-सर्वसाधारण महिला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या