💥पुर्णेतील राष्ट्रीयकृत बँकांची अर्थव्यवस्था गाढवांच्या हाती ? राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमवर अक्षरशः गाढवांचे कब्जे....!


💥शहरातील राष्ट्रीयकृत बँकांची एटीएम झाली मोकाट गाढवांसह जनावरांची आश्रयस्थान💥


पुर्णा (दि.१९ जुलै) : राष्ट्रीयकृत बँकातून आपला आर्थिक व्यवहार करणाऱ्या खातेदार ग्राहकांना जेवढी किंमत संबंधित बँकांतील अधिकारी/कर्मचारी देत नाहीत त्याही पेक्षा जास्त किंमत मोकाट गाढवांसह बँकांमध्ये दलाली करणाऱ्यांना मिळत असल्याचे चित्र पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पाहावयास मिळत असून खातेदार ग्राहकांना बँकेत गेल्यानंतर बेजवाबदार रग्गेल अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अडमूठ बाता तर 'एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेल्यास गाढवांच्या लाता' अश्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.


शहरातील भारतीय स्टेट बँक,महाराष्ट्र बँक आदी बँकांच्या एटीएमची सुरक्षा व्यवस्था बँक प्रशासनाने मोकाट गाढवांसह अन्य जनावरांकडे बहाल केली की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून शहरातील संबंधित बँकांच्या एटीएम मध्ये रात्रंदिवस गाढव व अन्य मोकाट जनावर ठाण मांडून बसत असल्यामुळे खातेदार ग्राहक वर्गाची अक्षरशः  तारांबळ उडत आहे या संदर्भात अनेक वेळा वर्तमान पत्रांसह वेबवृत्त वाहिण्यांवर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर देखील संबंधित बँक प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्यामुळे संबंधित बँकांतील बेजवाबदार अधिकारी/कर्मचारी यांची दलाल तसेच मोकाट गाढवांसह जनावरांशी असलेली अभेद्य युती कायमच असल्याचे निदर्शनास येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या