💥परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वृक्ष रोपण व वृक्ष वितरण....!


💥यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.26 जुलै ) : कृषि विभागाच्या वतीने मानवत तालूक्यातील मौ. पिंपळा, मौ. सावळी आणि मौ. बोंदरवाडी तर जिल्‍हा रेशीम विभागाच्या वतीने मौ. पाळधी येथे जिल्‍हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते वृक्ष रोपण व वितरण करण्यात आले.

     यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा रेशीम अधिकारी  कदम, उप विभागीय कृषि रवी हरणे, तालूका कृषि अधिकारी श्री. नाईक, मंडळ कृषि अधिकारी गुलाब शिंदे यांची उपस्थिती होती.

      जिल्हाधिकारी आंचल गोयल यावेळी म्हणाल्या की, आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी खुपच अनुकूल आहे. यामुळे हवामानाच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकर्‍यांना फारसा विचार करावा लागत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आता पारंपारिक पीक पध्दती ऐवजी फळबाग लागवडीचा विचार करावा. कृषि विभागामार्फत आता फळबाग लागवडीकरीता विविध योजना शेतऱ्यांसाठी शासनाने सुरु केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पध्दती सोडून फळबाग लागवडीचा विचार करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास नक्कीच मदत होईल.

            यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मौ. पिंपळा येथील सिताफळ तर मौ. बोंदरवाडी येथे केळी, मौ. सावळी येथे आंबा आणि मौ. पाळधी येथे तुती वृक्षाची लागवड करुन लाभार्थ्यांना वृक्ष वितरण केले. यावेळी संबंधीत गावातील लाभार्थी शेतकरी, सरपंच, कृषि सहायक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या