💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले शिंदे सरकारला मतदान...!


💥मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या सरकारणे केला बहुमताचा आकडा पार : १६४ आमदारांनी केले सकारच्या बाजूने मतदान💥

परभणी (दि.०४ जुलै) - जिल्ह्यातील पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय रासपा आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.रत्नाकर काका गुट्टे यांनी आज सोमवार दि.०४ जुलै २०२२ रोजी अत्यंत महत्वपुर्ण ऐतिहासिक निर्णय घेत राज्यातील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट व भाजपा युतीच्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जाहीर पाठिंबा देत सरकाच्या बाजूने मतदान केले.


राज्यातील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे सरकारच्या बाजूने तब्बल १६४ मतदान झाले असून दणदणीत बहुमताने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकाने विरोधकांना चारिमुंड्या चित केले असून गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शिंदे सरकारला मतदान केल्याने त्यांचे मतदार संघातून सर्वत्र अभिनंदन होत आहे....

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या