💥पाथरी येथील स्व नितिन महाविद्यालयात दिक्षांत समारंभ संपन्न....!


💥या वेळी दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी:-स्वामी रामानंद तिर्थ  मराठवाडा विद्यापिठ नांदेड,संलग्नित स्व नितिन महाविद्यालयात बुधवार २० जुलै रोजी सकाळी अकरा वाजता २४ वा दिक्षांत समारंभ संपन्न झाला.


या वेळी दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेडचे इतिहास विभाग प्रमुख यु ई बोकारे हे होते या वेळी मंचावर परिक्षा विभाग प्रमुख प्रा डॉ आर एम जाधव,प्रा डॉ जगन्नाथ बोचरे,प्रा डॉ एम डी ठोंबरे,प्रा डॉ ए ए सोळंके यांची उपस्थिती होती. या वेळी प्रभातफेरी ने मान्यवरांचे आगमन कार्यक्रम स्थळी झाले या वेळी स्वामी रामानंदतिर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करून विद्यापिठगिता नंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. या वेळी मान्यवरांच्या स्वागता नंतर परिक्षाविभाग प्रमुख प्रा डॉ आर एम जाधव यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रमुख अतिथी प्रा यु ई बोकारे  यांनी स्नातकांना उद्देशून बीज भाषण केले. तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी केला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान शाखेच्या ४४,वाणिज्य शाखेच्या २५,आणि कला शाखेच्या १३ स्नातकांना पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा तुळशीदास काळे यांनी केले तर आभार प्रा डॉ जगन्नाथ बोचरे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या