💥जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ऊंचावण्याची जबाबदारी सर्वांची - गोविंद यादव


💥स्वर फाऊंडेशनने विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून यादव बोलत होते💥

गंगाखेड : खरे गरजू विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच शिक्षण घेत असतात. म्हणून या शाळा दर्जेदार शिक्षणाची केंद्रे झाल्या पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा ऊंचावण्याची जबाबदारी सर्वांची असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. 


गंगाखेड येथील अनुसयाबाई चौधरी केंद्रीय प्राथमिक शाळेत गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना स्वर फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणीक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून गोविंद यादव बोलत होते. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य श्रीकांत भोसले, आपचे जिल्हा ऊपाध्यक्ष सखाराम बोबडे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, युवा नेते साहेबराव चौधरी, केंद्र प्रमुख शिवाजी फड, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश लटपटे, व्यंकटेश विद्यालयाचे राजेश खाकरे, आर डी भोसले, मारोती सातपुते, संयोजक रंजीत शिंदे, सचीन सुर्यवंशी आदिंची ऊपस्थिती होती. 

श्रीकांत सुभाष शितोळे, अलीया असतील सय्यद, दिपक गणेश शिंदे, माऊली गणेश शिंदे, साईराज बालाजी मोरे, सोनपरी कांबळे, शेख शिरीन आदिं विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी  विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या विविध ऊपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वखर्चातून वाहन व्यवस्था करणारे शिक्षक, शिक्षिका सौ. दहे यांची ऊपक्रमशीलता आदिंचे ऊपस्थित पाहुण्यांनी कौतूक केले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याची हमी यावेळी ऊपस्थितांनी दिली. प्रास्तावीक मुख्याध्यापक लटपटे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष चव्हाण यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या