💥सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथे लांडग्याच्या हल्यात दोन शेळ्याचा मृत्यु...!


💥हिवरखेडा येथील गायरान शिवारातील घटना💥  शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथे आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास लांडग्यानी केलेल्या हल्यात दोन शेळ्याचा मृत्यु झाला आहे हिवरखेडा येथील शेतकरी तुळशीराम फूपाटे या शेतकऱ्यांच्या शेळ्या चारन्यासाठी त्याचे मुले गेऊण गेले होते ह्या शेळ्या हिवरखेडा येथील गायरान जमीनीवर चारन्यासाठी नेल्या होत्या मात्र अचानकपणे लांडग्यानी हल्ला करून दोन शेळ्याचा मृत्यु झाला आहे शेळ्या चारनाऱ्या मुलांनी आरडा ओरडा गेला त्यामुळे बाकीच्या शेळ्या पळून गेल्या आहेत मात्र या हल्यात दोन शेळ्याचा मृत्यु झाला आहे एक शेळी तर गाभण होती यामुळे या शेतकऱ्यांचे अंदाजे 25 ते 30 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

रात्रि पासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि आज सकाळी भर पावसात शेळ्या चारन्यासाठी नेल्या होत्या पाऊस पडत असल्याने शेळ्या जंगलात सोडून दिल्या व शेळ्या चारनारे मुले एका झाडा खाली बसले होते या संधीचा फायदा घेत लांडग्यानी या शेळ्या वर हल्ला चढवला आहे त्यामुळे फुपाटे ह्याचे  आर्थिक मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंचनामा करून त्याना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तुळशीराम फुपाटे यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या