💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला अखेर यश......!


💥पाथरा येथील कबरस्थान नाला प्रशासनाने केला साफ़💥

परभणी - तालुक्यातील पाथरा येथील कब्रस्तान शेजारील नाल्यातील पाणी कब्रस्तान मध्ये साचत असल्यामुळे ज्या मृत व्यक्तींचे दफनविधी करण्यात आलेले आहेत त्यांच्या मृतदेहाची विटंबना होत आहे त्याशिवाय गावामध्ये एखादा नवीन व्यक्ती मृत पावल्यास त्यांचा दफनविधी कब्रस्तान मध्ये करणे शक्य नसल्याकारणाने कब्रस्तान शेजारून जाणारा नाला मोकळा करून कब्रस्तान मध्ये साचणाऱ्या पाण्याला वाट करून द्यावी आणि तो नाला साफ करावा याबाबत पाथरा येतील नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी दिल्या होत्या परंतु मागील दहा वर्षापासून हा विषय मार्गे लागत नसल्याने पाथरा येथील गावकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार दिली होती व याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणे बाबत विनंती करण्यात आली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व पाथरा येथील नागरिकांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन संबंधित नाला तात्काळ साफ करून कब्रस्तान मधील साचलेल्या पाणी बाहेर काढण्या बाबत विनंती केली होती. त्याच बरोबर परभणीचे गटविकास अधिकारी यांचीही भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले होते व संबंधित काम तात्काळ मार्गे न लागल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवेदनातील मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रशासनाने काल पाथरा येथील कब्रस्तान बाजूला असलेला नाला जेसीबीच्या साह्याने साफ करून कब्रस्तान मध्ये साचलेले पाणी नाल्याद्वारे बाहेर काढले कब्रस्तान शेजारील नाल्याचे रुंदीकरण केल्यामुळे व नाला साफ केल्यामुळे भविष्यात कब्रस्तान मध्ये पाणी जमा होणार नाही. प्रशासनाने केलेल्या कामांमुळे पाथरा गावातील नागरिकांच्या मागील दहा वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून पाथरा गावातील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख सय्यद मुस्तफा, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई शेख अमजद, सय्यद महेबूब, सय्यद अरमान, सय्यद समीर इत्यादींच्या सह्या होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या