💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥अमरावतीत दूषित पाण्याचे 3 बळी ; अनेकांची प्रकृती बिघडली,खासदार नवनीत राणा आक्रमक💥

  ✍️ मोहन चौकेकर 

* पुण्यात जोरदार पावस आणखीन पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता ; पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

* हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ; या संपूर्ण पूर परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत

* अमरावतीत दूषित पाण्याचे 3 बळी ; अनेकांची प्रकृती बिघडली,खासदार नवनीत राणा आक्रमक,मुख्यमंत्र्यांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन

* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असून एकनाथ शिंदेचे हायकमांड दिल्लीत असल्याने कॅबिनेट ठरविण्यासाठी ते गेले असावेत ; खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टिका

* “चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होईल”; शशीकांत दास यांनी व्यक्त केला विश्वास देशात आर्थिक स्थैर्य राहण्यासाठी किंमती नियंत्रणात असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिझर्व बॅंकेतर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही शशीकांत दास म्हणाले.

* नाशिक जिल्ह्यातील हरसूल जवळील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांना या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे 

* राज्यातील नव्या सरकराचा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी वारीनंतर होणार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत घोषणा

* मराठवाड्यात पावसाचा हाहाकार,* अनेक गावांचा संपर्क तुटला, हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून 

* आषाढीला विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार,* *राज्यात नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोगाकडून तीन अटींसह परवानगी* 

* ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नको, खंबीर पावलं उचला,* पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी राज्यसरकारकडे मांडली सारखीचं भूमिका  

* श्रीलंकेत महागाईने हैराण झालेल्या नागरिकांचा राष्ट्रपती भवनावर कब्जा,तर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे राष्ट्रपती भवन सोडून पळून गेले असल्याचे वृत्त

* डोंबिवलीतील निष्ठावान शिवसैनिक मातोश्रीवर दबावाला बळी न पडता एकजुटीने काम करण्याचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा सल्ला

* अमरावती : पाणी पुरवठ्याची वीज खंडित केल्याने दूषित पाणी पिले ; ५० जण रुग्णालयात दाखल दुर्गम मेळघाटातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

* नागपूर : बलात्कारातून गर्भधारणा, अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल कधी धमकावून तर कधी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध जोडले

* ‘पुनर्वसु’ नक्षत्राने दाखवले रौद्र रूप; नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपले नांदेड-मालेगाव-वसमत महामार्गावरील वाहतूक बंद

* खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा २४ टक्क्यांवर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस सुरूच

* पुणे : प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे एक कोटींची खंडणी मागणारा अटकेत आरोपीच्या ई-मेलमध्ये राज्य घटनेचा अवमान

* शिक्षक भरतीसाठी स्व प्रमाणपत्र अद्ययावत करणे आवश्यक ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचा या पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही

* आता तर स्मिथनेही ठोकले शतक ; विराट कोहली मात्र अजूनही प्रतिक्षेतच Steve Smith Test Century : श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथने कठीण परिस्थितीत शतक झळकावले.

* एजबस्टनमध्ये आज अटीतटीची लढत ; रिचर्ड ग्लीसनचे तीन बळी तीन टी २० सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या