💥कडोळी येथे संसद आदर्श ग्राम योजना बैठक ग्रामविकास आराखडा मार्गदर्शन, प्रशिक्षणाचे आयोजन....!


💥खासदार हेमंत पाटील यांच्याकडून या गांवचा विकास होण्यासाठी निवड करण्यात आली💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सेनगांव तालुक्यातील कडोळी हे गांव नानाजी देशमुख यांची जन्मभूमी असून हे गांव आदर्श गांव बनाव म्हणून खासदार हेमंत पाटील यांच्याकडून या गांवचा विकास होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने दि.६ जुलै रोजी गांवातील श्री.रमतेराम महाराज संस्थान हाॅल मध्ये ग्रामविकास आराखडा,मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.हयामध्ये गांवाचा विकास घडविण्यासाठी गांवातील नागरिकांनी शिक्षण, आरोग्य, मजुंराचे प्रश्न, गांवात स्वच्छता मिशन, स्मशानभूमी, आदी सह बरेच प्रमाणात विकास कामे बाकी असून आता हयामध्ये ज्या काही ग्रामीण भागातील नागरीकाच्या समस्या आहेत.


पण त्या सोडविण्यासाठी आपण गांवातील नागरीक एकत्र येऊन व नागरीकाने आपले मतभेद दूर करावे. तर या ठिकाणी गांवातील महिला व पुरुषाने गांवा ह्याने हे गाव विकासापासून कोसो दुर असल्याने गांवात कोणत्याही प्रकारे विकास नाही. तर हया आधी आमदार तान्हाजी मुटकूळे यांनी सुध्दा हेच केले.पण विकास मात्र शून्य आहे.तर हया वर मा. जिल्हाधिकारी पापळकर,उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैणे आदींनी मा. जिल्हाधिकारी यांचे म्हणणे आहे की तुमच्या गावांमध्ये स्वर्गीय नानाजी देशमुख हे भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार मिळालेले महान पुरुष होऊन गेले आणि ह्या गावच्या विकास कोसो दूर असल्याने हे गावची विकास करण्यासाठी खासदार साहेबांनी हया गावांची निवड या आदर्श गाव योजनेत सहभाग करून घेण्यात आले असे हया वेळी म्हटले आहे. तर हया उमाकांत पारधी यांनी सांगितले की गावातून शिवार फेरी काढून आपण गावच्या काय समस्या आहेत हे एकदा एक वेळेस जाणून घेऊ तसेच मानवविकास झाला. तर गावात विकास घडेल व अगोदर गाव स्वच्छ करण्याचे मोहीम गावात राबवण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी धरली होती तर देणे साहेब म्हणतात मला फक्त मंदिर परिसरात स्वच्छ दिसत आहे बाकी सर्व गाव अस्वच्छित आहे त्याकरता सर्वांनी मिळून एकत्र येऊन गाव स्वच्छ करावे तसेच गावचा विकास करावा आम्ही तुमच्या पाठबळ देऊ. तर या ठिकाणी उपस्थित जीवन कुमार कांबळे (तहसीलदार सेनगाव), संदीप वळकुंडे (तालुका कृषी अधिकारी सेनगांव) डाॅ.सतिष रुणवाल (तालुका आरोग्य अधिकारी) टी.ई. कराड (कामगार विभाग अधिकारी) राजापुरे सर (अपर तहसीलदार गोरेगाव),एस.व्ही.गोरे (गटविकास अधिकारी सेनगांव) विवेक कुमार वाकडे (बालविकास प्रकल्प हिंगोली) श्रीदेवी पाटील (पोलीस निरीक्षक गोरेगाव) साळवे मॅडम मंडळ अधिकारी ढगे तलाठी एच.टी. सगर (अभियंते सेनगांव) आदी सह सरंपच सुजाता गुडदे, उपसरपंच.मुक्ताबाई सुर्यवाड,ग्रामसेवक भुजंग सोनकांबळे ग्रा.प.सदस्य गजानन हमाने, अरविंद भाकरे, महेन्द्र इंगोले, शिवाजी कुरवाडे,चंद्रभागाबाई इंगळे,नंदाबाई माहोरकर,विजयामाला कांबळे,गजानन भाकरे,सुनिल पाईकराव,संतोष गुडदे, नंदकुमार सुर्यवाड,आदी सह हया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृष्णा दंवड यांनी गेले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या