💥परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी आवाहन....!

 


💥प्रवेश अर्ज दि.8 ऑगस्ट पर्यंत समाज कल्याण कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सादर करावे💥

परभणी (दि.29 जुलै) : सन २०२१-२२ पासून महाराष्ट्र शासनाकडून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामाकिंत निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहेप

परभणी जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा इंग्रजी माध्यमांच्या नामाकिंत निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज सोमवार दि.8 ऑगस्ट 2022 पर्यंत समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, परभणी येथे सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.

           शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इत्यादी सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजातील असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला धनगर समाजाच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी लागेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा  1 लाख रुपये इतकी असावी. सन २०२२-२३ या वर्षात विद्यार्थी पहिली ते पाचवी या इयत्तेत प्रवेशित असावा. अशा अटी व शर्ती आहेत.  परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कुल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, सेलु येथील एल.के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कुल आणि सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील मुन्सीराम तांड्यावरील कै.मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अशा तीन  शाळांची निवड करण्यात आली आहे. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या