💥जिंतूर तालुक्यातील खरीपातील पिके बहरली : शेतकऱ्यांमध्ये संतोषाचे वातावरण....!


💥शेतकरी अंतर मशागतीसह पिक संरक्षणाच्या कामात व्यस्त💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर मागील काही दिवसापासून तालुक्यान समाधान कारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील खरीप पिके बहरात आली आहेत. तालुक्यात या हंगामात सोयाबीन पिकाची 52824 (102.9990) [हेक्टर व कापूस पिकाची 29513/108-13%) हेक्टर क्षेत्र या दोन मुख्य पिकांची पेरणी झालेली आहे.

तालुक्यातील मौजे शेवडी या गावच्या शिवारातील पिकांची पहाणी केली असता शेतकरी अंतर मशागतीची व पिक संरक्षणाची कामे करत असल्याचे दिसून आले. खेडी गावातील श्री शिवाजीराव सानप, शेषराव घुगे, बापूराव घुगे यांचे शेतातील सोयाबीन, झेंडू, कारली या पिकांची पहाणी केली. श्री शेषराव घुगे यांनी या वर्षी पहिल्यांदाच टोकण मंत्राच्या साहाय्याने सोयाबीन पिकाची पेरणी केलेली असून या मुळे बियाणेची बचत झालेली असल्याचे या पद्धतीने पेरणी केल्यामुळे अंतर मशागत करणे सोपे झालेले आहे तसेच पिकास हवा खेळती मिळेल व सूर्यप्रकाश जास्तीतजास्त मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित शेतकन्यांना नियंत्रण पिक संरक्षण व खत स्थापन या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीन  पिवळे पडत असल्यास शेतात जमा झालेल्या पाण्याचा निचरा करावा तसेच पिकांवर 19:29-19 हे पाण्यात विरघळनारे खत व पेज -2 चे सूक्ष्म अ प्रत्येकी 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी करताना त्यासोबत इतर कुठलेही औषध मिसळून फवारणी करू नये. सोयाबीन पिकावर आज रोजी अलिका पा कीडनाशकाची फवारणी केल्यास पी भुगाव खोडमाशी या किडीचे नियंत्रण योग्य प्रकारे करता येईल. कापुस पिकावर शेतकयांनी नॅनोरिया फवारणीतून 14 mi] लिटर पाण्यातून वापर केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. असे तालुका कृषि अधिकारी श्री एस. पी. काळे यांनी उपस्थित शेतकर्यानां सांगितले. खरिपातील पिकांना सध्या मोजकाच पाऊस पडत असल्यामुळे पिक परिस्थिती समाधान कारक असल्याचे दिसून आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या