💥आखिल भारतीय ग्रंथालय संघ दिल्लीच्या संचालकपदी डाॅ.रामेश्वर पवार यांची निवड....!


💥त्यांना या निवडीचे पत्र इंडियन लायब्ररी असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी डाॅ.ओ.ए.चौब्बे यांनी नुकतेच दिले आहे💥

पूर्णा (दि.०४ जुलै) - येथील श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष प्रोफेसर डॉ.रामेश्वर पवार यांची अखिल भारतीय ग्रंथालय संघ, दिल्लीच्या सार्वजनीक ग्रंथालय विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र Indian Library Association चे जनरल सेक्रेटरी डाॅ.ओ.ए. चौब्बे यांनी नुकतेच दिले आहे.

महाराष्ट्र राज्यातील दोन प्रतिनीधीची निवड या संघावर करण्यात आली असून प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार आणि डाॅ.राजशेखर बालेकर हे दोघेही ग्रंथालय चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. त्यांची ही निवड २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी करण्यात आली असल्याचे प्रोफेसर डाॅ.रामेश्वर पवार यांनी सांगीतले.डॉ.रामेश्वर पवार गेली तीस वर्षे ग्रंथालय चळवळीत कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास शंभर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर  आपले शोधनिबंध सादर केले असून पंधरा ग्रंथ लिहिले आहेत.

 त्यांच्या या निवडीबद्दल श्री.गुरुबुध्दी स्वामी शिक्षण संस्थेचे  कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे, सचिव प्रा.गोविंद कदम, सहसचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम, अखील भारतीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.मोहन खेर्डे, मुंबई येथील एसएनडीटी विद्यापीठाचे माहिती व ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ.सुभाष चव्हाण, प्राचार्य डाॅ. के. राजकुमार  आदि मान्यवरांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या