💥नगर परिषद कर्मचारी संजय जाधव यांना बंधुशोक💥
परळी वैजनाथ (दि.१७ जुलै) :- परळी शहरातील इंदिरानगर, कन्या शाळा रोड भागातील रहिवाशी अशोक हनुमंतराव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समय 70 वर्ष वयाचे होते. नगरपरिषद कर्मचारी संजय हनुमंतराव जाधव यांचे ते मोठे बंधू होत.
अशोक हनुमंतराव जाधव हे अतिशय धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना व वैद्यनाथ सहकारी साखर कारखानेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. सर्वपरिचित असे ते व्यक्तिमत्व होते. अशोक जाधव यांच्या पाश्चात दोन मुले एक मुलगी व भाऊ, बहिणी, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने जाधव कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात.......सहभागी आहे....
0 टिप्पण्या