💥राज्यपुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न....!


💥डॉ.गजानन गडदे यांनी सद्य परिस्थीतीत सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी व उत्पादकता वाढीबाबत मार्गदर्शन केले💥

कृषि विभागामार्फत पुर्णा तालुक्यातील मौजे सोन्ना या गावी दि.27.07.2022 रोजी राज्यपुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे यांनी सद्य परिस्थीतीत सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी व उत्पादकता वाढीबाबत सखोल मार्गदर्शन केले.

मागील 15 दिवसापासून सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून पाने पिवळे पडत आहेत असे प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात डॉ गडदे म्हणाले की सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहत असल्यामुळे पिकाच्या मुळांची अन्नद्रव्य देवाण घेवाण करण्याची प्रक्रिया मंदावली आहे. तसेच सुर्यप्रकाशाच्या अभावी प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नसल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असुन पाने पिवळी पडत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी 19:19:19 या विद्राव्य खताची 100 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त गेड-2 या द्रव्यरूपी खताची 50 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. यानंतर कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे श्री.एम बी मांडगे यांनी सोयाबीन  पिकावरील एकात्मिक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापनाविषयी तसेच शंखी गोगलगायीच्या नियंत्रणा विषयी मार्गदर्शन केले. 

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोन्ना गावचे सरपंच श्री. शरद पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थीती श्री.आर एच तांबीले तालुका कृषि अधिकारी, पुर्णा यांची होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.रवी माने यांनी केले तर प्रस्तावना श्री.आर एस तांबिले, यांनी केली आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.एस एस वाघमोडे मंडळ कृषि अधिकारी पुर्णा, यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.एस बी शिंदे कृषि पर्यवेक्षक चुडावा, श्री.बी एस तिडके कृषि सहाय्यक, सोन्ना, श्री.विजय घाटोळ कृषि सहाय्यक, हिवराबेल व श्री.नितीन मोहिते यांनी परीश्रम घेतले. या प्रशिक्षणास 54 शेतकरी उपस्थीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या