💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.18 जुलै रोजी काढण्यात येणार आहे ओ.बी.सी.महा विराट मोर्चा💥
जिंतूर
प्रभाकर कुर्हे चारठाणकर
परभणी येथे नियोजित 18 जुलै रोजी काढण्यात येत असलेल्या राज्य स्तरीय महा विराट मोर्चाच्या नियोजन समिती बैठक जिंतूर येथील स्वाद फंक्शन हाॅल येथे दि. 6 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाली या वेळी ओ. बी. सी. आरक्षण वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय निघणाऱ्या महा विराट मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, ओ. बी. सी जनगननेची खुप दिवसा पासुन ची मागणी आहे परंतु ती न करता या उलट ओ. बी. सी राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले या विरोधात ओ. बी. सी जनगणणा झाली पाहिजे, आरक्षण जैसे थे ठेवा आणी आरक्षण लागू करे पर्यंत निवडनका स्थगिती देण्यात याव्यात या प्रमुख मागणी साठी 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा च्या अनुषंगाने तालुका स्तरीय नियोजन बैठक घेऊन नियोजन व जनजागृती करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून जिंतूर येथे नियोजन बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी स्वराजसिंह परिहार ,भगवानराव वाघमारे,रामप्रभु मुंडे ,नानासाहेब राऊत,किर्तीकुमार गुरांडे,आनंद बनसोडे,कृष्णा कटारे,ॲड.संजय केकान,हरिहर वंजे, अविनाश काळे, राजाभाऊ नागरे, भगवानराव वयाने, लक्ष्मणराव बुधवंत,रमेश गिते, केंद्रेताई, राठोड ताई यादींसह समाजाती मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच, ओ.बी.सी नेते उपस्थित होते......!
0 टिप्पण्या