💥मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे सर्पमिञाने दिले दुर्मिळ मांडूळ सापाला जीवदान....!



💥विटांच्या ढिगाऱ्यात असलेल्या ४ फुट लांब बिनविषारी दुर्मिळ मांडूळ सापाला सुरक्षित रित्या रेस्क्यू केले💥                       

(फुलचंद भगत)

वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे निघालेल्या दुर्मिळ मांडूळ सापाला श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सर्पमित्र यांनी वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडत जीवदान दिले. 


                   दि.१ जुलैच्या दुपारी वनोजा येथील सुभाष टोंचर यांच्या गोठ्याजवळील विटांच्या ढिगार्यात त्यांना एक साप जाताना दिसला. त्यांनी लगेच संबंधित घटनेची माहिती श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सर्पमित्र शुभम हेकड यांना दिली. माहिती वरून सर्पमित्र शुभम हेकड, प्रविण गावंडे व आदित्य इंगोले घटनास्थळी दाखल झाले.व विटांच्या ढिगार्यात असलेल्या ४ फुट लांब बिनविषारी दुर्मिळ मांडूळ सापाला सुरक्षित रित्या रेस्क्यू केले. सदर घटनेची माहिती कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी श्री. अमित शिंदे यांना दिली. नंतर वनपाल श्री. नवलकर व वनरक्षक श्री. जामकर यांनी सापाचा योग्य पंचनामा करून सदर सापाला निसर्ग अधिवासात सोडत जीवदान दिले. हा साप दुर्मिळ प्रकारात मोडत असुन ४ वर्षामध्ये वनोजा परिसरात फक्त ४ मांडूळ साप रेस्क्यू करून निसर्ग अधिवासात सोडण्यात आले. हा साप जिथे असेल तिथे पैशाचा पाऊस पडतो, गुप्तधन असते व इतर अंधश्रद्धेपोटी याची तस्करी होते. तसेच मोठ्या रोगांची औषधी निर्माण करण्यासाठी याचा वापर होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील लाखो, करोडो रुपयांमध्ये याची तस्करी होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या