💥भारतीय डाक विभागातर्फे फिलाटेली स्कॉलरशिप....!


💥सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी दीनदयाल स्पर्श योजना💥

परभणी (दि.25 जुलै) : भारतीय डाक विभागातर्फे सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी दीनदयाल स्पर्श योजना ही  "फिलाटेली स्कॉलरशिप" सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि तिकिटांचे संशोधन करण्याचा छंद निर्माण करण्याचा डाक विभागाचा मानस आहे. ज्या विद्यार्थ्यानी हा छंद जोपासला आहे. 

अशा विद्यार्थ्याची डाक विभागातर्फे "फिलाटेली प्रश्नमंजुषा" आणि “फिलाटेली प्रकल्प” या आधारावर निवड करून मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. निवडक विद्यार्थ्याना एक वर्षासाठी सहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन डाक अधिक्षक परभणी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या