💥 हिंगोली जिल्हा शिवसेनेचा नवा जिल्हा प्रमूख कोण ?


💥आ.संतोष बांगर यांच्या बंडखोरीनंतर अनेकांनी लावली जिल्हा प्रमूख पदासाठी फिल्डिंग💥

💥शिवसेना जिल्हा प्रमूख पदी संदेश देशमुख यांची निवड करावी कार्यकर्त्यांची मागणी💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमूख व आमदार संतोष बांगर हें बंड करून शिंदे गटात गेले आहेत आत्ता त्याचे कडे जे शिवसेना जिल्हा प्रमूख पद आहे ते जाणार असल्याची चर्चा जिल्हा भरात  होत आहे शिवसेना  संपर्क प्रमूख आनंदराव जाधव यांनी हिंगोली येथील शिवसैनिका सोबत बैठक घेतली आणि शिवसेना पक्ष प्रमूख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी हिंगोली येथील शिवसैनिकासोबत फोन वर संवाद साधला आणि तुम्ही सर्व जन माझ्या सोबत आहेत जे गेले ते जाऊ द्या आपन पुन्हां नव्याने शिवसेना उभी करू असे आव्हान पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केले आहे आत्ता हिंगोली येथील शिवसेना जिल्हा प्रमूख कोण याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे ?

शिवसेना जिल्हा प्रमूख पदी संदेश देशमुख यांची निवड करण्यात यावी अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शिवसैनिकाडून मागणी केली जात आहे संदेश देशमुख जिल्हा प्रमूख व्हावे असे सोशल मीडियावर पोस्ट व्ह्ययलर होत आहेत 

बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी अचानक शिंदे गटात सहभागी होऊन सर्वांनाच धक्का दिला. शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान करत बांगर यांनी अखेर बंडाचा झेंडा हाती घेतलाच. आत्ता हिंगोलीत शिवसेना जिल्हाप्रमुख पद कोणाला मिळणार व नवा सरदार कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासाठी अनेकांनी फिल्डींगदेखील लावली आहे. 

           हिंगोलीचे जिल्हाप्रमुख राहिलेले बांगर आक्रमक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या भिडस्त स्वभावामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. गेल्या विधासभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने त्यांच्या कलमनुरी  विधानसभा मदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले. पण,अडीच वर्षात त्यांनी बंडखोरांचे नेतृत्व स्वीकारले शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता, त्याहीपेक्षा तो हिंगोलीवसियांसाठी होता, ज्यांनी दोनच दिवसांपूर्वी बांगर यांच्या कट्टर, कनिष्ठ, एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन सत्कार केला होता. आत्ता बांगर यांच्या तोडीसतोड असे नेतृत्व शिवसेनेला शोधावे लागणार आहे     जिल्ह्यातील राजकारणाला बांगर यांच्या बंडाणे कालटनी मिळाली आसली तरी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवणारा मोठा शिवसेनेचा वर्ग आहे. त्या जोरावर आता नवा सरदार म्हणजे जिल्हाप्रमुख नेमून शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याचे आवाहन नेत्यांसमोर असणार आहे. 

           जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. हिंगोली जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ले म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार एक आमदार, व औंढा व सेनगाव येथील नगरपंचायत तसेंच जिल्हा परिषदेत देखिल शिवसेनेचे अध्यक्ष होते वसमत व कळमनुरी नगरपालिका शिवसेनेकडे होती दरम्यान बांगर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्या मुळे सेनेत दोन गट पडले आहेत जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघात युतीच्या कळात सेनेकतर वसमत हिंगोली विधानसभा भाजपाकडे होती कळमनुरीत संतोष बांगर यांनी विजय मिळवून ह्या मतदारसंघ सेनेच्या ताब्यात घेतला होता तसेंच त्यांच्याकडे जिल्ह्या प्रमूख हें पद देखिल होते मात्र आत्ता त्यांनी शिवसेनेसोबत बंड केल्या मुळे त्याचे हें पद जाणार त्याची जागी नविन जिल्हा प्रमूख कोण यांची उत्सुकता सर्वांना लागली आहे 

*शिवसेना जिल्हा प्रमूख पदाचे दावेदार :-

आत्ता हिंगोलीत नवीन जिल्हा प्रमूख पदासाठी आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे या साठी शिवसेनेचे माजी मंत्री .डॉक्टर जय प्रकाश मुंदडा यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन त्याना जिल्हा प्रमूख करावे अशी मागणी केली जात आहे तर ईकडे सेनगाव येथील संदेश भाऊ देशमुख यांना जिल्हा प्रमूख करावे या साठी सेनगाव तालुक्यातील मा त्यांच्या समर्थकांनी देखिल सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केली जात आहे तर सुनील काळे .परमेश्वर माडगे बाळासाहेब मगर हें देखिल शिवसेनेच्या जिल्हा प्रमूख पदाचे दावेदार मानले जात आहेत ? आत्ता माळ कोणच्या गळ्यात पडणार यांच्या कडे सर्वाचे लक्ष लागले आहेत ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या