💥दोन आठवड्यापूर्वी तहसील कार्यालय समोरील खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजविण्यात आले होते💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
जिंतूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे 178 गावातील अनेक नागरिकांना जिंतूर येथे विविध कामासाठी यावे लागते. शहरातील तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्याची दुरुस्त झाली असून या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पाणी साचलेले आहे. यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असतो. जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते शासकीय विश्राम गृह पर्यंत मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहे.
दोन आठवड्यापूर्वी तहसील कार्यालय समोरील खड्डे हे थातूरमातूर पद्धतीने बुजविण्यात आले होते. पण सध्या पावसाळ्याचे दिवस असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ आता उघडे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातही अनेक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे रस्त्याची अधिक दुरुस्त झालेली दिसून येते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढलेली आहे. या रस्त्याने प्रवास म्हणजे अबब....! किती खड्डेच खड्डे असे सहज तोंडातून निघून जाते या रस्त्यावर दिवसभर आणि रात्रीही मोठ्या संख्येने वाहनाची ते जा असते परिणामी अपघाताची भीती वाढली आहे शहरातील मुख्य व विविध भागातील रस्त्यांची ही मोठी दुरुस्त झालेली आहे संबंधित कंत्राट दाराने खड्डे बुजणांचे दर्जेदार काम केले नसल्यामुळे दोन आठवड्यातच पुन्हा खड्डे पडले आहे त्यामुळे प्रवाशांना व शासकीय कामासाठी तहसील ,पंचायत समिती, न्यायालय या कार्यालयात जाताना का सहन करावा लागत आहे....
0 टिप्पण्या