💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट हेडलाईन्स बातम्या...!


💥‘धर्मवीर’ला मिळाला चित्रपटसृष्टीमधील मानाचा पुरस्कार💥

 ✍️ मोहन चौकेकर 

* १९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या ‘स्मार्ट प्रोजेक्ट’ला गती द्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामकाजास प्रारंभ केला.

* विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या ९ काँग्रेस आमदारांना पक्षाकडून नोटीस अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

* मुंबईत मध्य रेल्वेवर दोन तासांचा ब्लॉक ; एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडाळीनंतर राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत, तर दुसरीकडे मान्सून हळूहळू राज्यात सर्वदूर पसरू लागला आहे.

* औरंगाबादच्या नामांतरावर काँग्रेस हायकमांड नाराज ? राज्यातील मोठा नेता म्हणतो ‘विश्वासात घ्यायला हवे होते’ राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले होते.

* ठाण्यातील सेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत ; विरोधात आहे एकमेव महिला नगरसेवक कारण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहिती दिली.

* ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात पाणी साचले ; पालिका यंत्रणेची उडाली तारंबळ लुईसवाडी भागातील निवासस्थान परिसरातील सखल भागात पाणी साचले होते*

* ‘धर्मवीर’ला मिळाला चित्रपटसृष्टीमधील मानाचा पुरस्कार, प्रसाद ओक म्हणाला, “आनंद दिघे यांना हा पुरस्कार ” ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीमधील मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

* “एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं”; विनायक राऊत संतापले; म्हणाले “धनुष्यबाण आमच्या बापाने…” “मला आज पश्चाताप होत आहे, माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे”

* “घरात घुसून मारलं होतं ना…”; करण जोहरवर पुन्हा संतापली कंगना रणौत, निमित्त ठरला ‘कॉफी विथ करण’ शो कंगना रणौतने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला सुनावलं आहे.

* पर्यटनस्थळांवर छोट्या विक्रेत्यांना जिल्हा परिषदेचा मदतीचा हात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी मक्याचे कणीस किंवा इतर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यासाठी तात्पुरते स्टॉल उभारण्यात येतात.

* वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, साधेपणा पाहून चाहत्यांनीही केलं कौतुक अभिनेता संदीप पाठक पांडुरंगाच्या भक्तीमध्ये मग्न झाला आहे.

* नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल, ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आलिया सिद्दीकीने कलाकारांना दिलेले चेक झाले बाऊंस

* भारतात वाढतो आहे ओमायक्रॉनचा  नवा उपप्रकार; WHO ने दिली महिती गेल्या दोन आठवड्यात करोनाच्या जागतिक स्तरावर नोंदवलेल्या केसेसेमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

* अमरावती कट्टरवाद्यांची प्रयोगशाळा होत आहे ; भाजप नेते कपिल मिश्रा यांचा आरोप गेल्या वर्षभरातील घटना पाहता अमरावती शहर हे धार्मिक कट्टरवाद्यांची प्रयोगशाळा बनत चालल्याचे दिसून येत आहे.

* “मला नक्कीच आठवण येईल” निवृत्तीनंतर सानियाची  भावनिक पोस्ट 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या