💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥देशात 200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला ; पंतप्रधान मोदींचे लस उत्पादकांना पत्र💥

✍️ मोहन चौकेकर 

* महाराष्ट्रातील राजकीय पेच; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार ; सर्वाेच्च न्यायालयात आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

* कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर. 

* गुहागर समुद्रकिनारी सिंगापूरमधील एका कंपनीचा मानवरहित बार्ज अडकला ; बार्जमध्ये इंधन नसल्यामुळे समुद्रातील प्रदूषणाचा कोणताही धोका नाही, असं भारतीय तटरक्षक दलाने सांगितलं

* देशात 200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला ; पंतप्रधान मोदींचे लस उत्पादकांना पत्र.

 *ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

* श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली ; रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती; 134 मतांनी विजयी 

* ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू ; दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचा पंधरा महिने टाईमपास ; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

* हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्माती प्रेरणा अरोराच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल ; ईडीकडून 31 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल.

* पुण्यातील नदीपात्र ते थेट लंडनचा कचरा साफ करणाऱ्या पुणेकर विवेक गुरव या तरुणाने 2019 मध्ये पुणे प्लॉगरची संकल्पना राबवली ; लंडनच्या पंतप्रधानांकडून सर्वोच्च पुरस्कार जाहीर.

* शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात वाढ, Nifty 16,500 वर तर Sensex 629 अंकांनी वधारला; ऑटो, उर्जा आणि रिॲलिटी सेक्टरमध्ये काहीसा दबाव असल्याचं दिसून आलं.

* राज्यात पुरामुळे २८ जिल्हे प्रभावित ; चंद्रपूरमध्ये दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्याची सद्याची पूर परिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्यावर वाहत आहे.

* “मविआच्या नेत्यांनी घोटभर पाण्यात बुडून मरावं” ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा खोचक टोला महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

* दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी अमित ठाकरे पंगतीला बसून जेवले;* पालघर दौऱ्यातील Video चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या सात दिवसीय दौऱ्यावर आहेत.

* करोना काळात नियमित झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ बद्दल केंद्र सरकारचा नवा निर्णय ; SEZ कायद्यात केला समावेश आता करोनानं बऱ्यापैकी उसंत घेतल्यानंतर आणि बहुतेक क्षेत्रांमध्ये पुन्हा पूर्ववत काम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने या कार्यपद्धती बाबत नवा निर्णय घेतला आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या