💥पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील गोरगरीबांचा संसारावर बुलडोजर चालवण्याचे कट-कारस्थान ?


💥बाळराज नगर मधील नागरिकांना हक्काच्या घरांपासून वंचित करण्याचा भुखंड माफियांचा कुटील डाव तर नाही ना ?💥

पूर्णा ; तालुक्यातील ताडकळस येथे अत्यंत अत्यंत उच्चभ्रू वसाहतीत मोडल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारपेठे लगतच्या गायरान जमीन गट क्र.३१२ मध्ये एससी/एसटी ओबीसी समाजबहूल वसाहत असलेल्या बाळराज नगरचा भाग येतो या बाळराज नगर मध्ये लोकांना अंदाजे १९८६ साली शासनाने इंदिरा आवास योजने अंतर्गत कच्च्या स्वरूपाचे विटा मातीचे घरकुल दिले होते. १९९३ साली किल्लारी येथे भूकंप झाला होता, दुर्दैवाने परभणी जिल्ह्यात ही भूकंप झाला तर, कोणती जीवितहानी होऊ नये’ या उद्देशाने शासनाने ४ गोलघर (डोम ) घरकुल म्हणून दिले होते. पण ते कालांतराने पडल्यामुळे, या ठिकाणी कोणी नवीन तर कोणी जुने घर बांधले आहेत. कोणाला नवीन घरकुल ही मंजूर होऊन त्याचे बांधकाम सुरु आहे, अशा परीस्थित पूर्णा तहसिलदार यांच्या कडून अतिक्रण हटवा अशा प्रकारच्या नोटीसा मागील सन २०२१ यावर्षी येथील रहिवासी नागरिकांना प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या बालराज नगर परिसरात बरेचशे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब नादत असून, त्यांची भविष्यात “गावात गेलं तर घर नाही, अन् वनात गेलं तर शेती नाही” अशी अवस्था होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याची घोषणा केली होती. पण यापुवी पूर्णा तहसिलदार यांच्या कडून आलेल्या अतिक्रण हटवा या नोटीस मुळे २०२२ पर्यंत बाळराज नगर मधील नागरिक बेघर होतात कि काय अशी चिंता निर्माण झाली आहे.


मागील सन २०२१ यावर्षी देखील बालराज नगरातील गोरगरीब आदीवासी एससी/एसटी ओबीसी समाजातील तब्बल तिस ते चाळीस रहिवास्याना नोटीसी बजावून प्रशासनासह न्याय पालिकेची दिशाभूल करीत नोटीसी बजावून त्यांना त्यांच्या हक्काच्या घरांमधून वंचित करून अक्षरशः त्यांचे संसार उधळून लावण्याचा डाव रचल्या गेला होता परंतु तत्कालीन पुर्व जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी तुमच्या निवासस्थानांना धक्का देखील लागू देणार नाही असे आश्वासन दिले होते काही काळ प्रकरण शांत झाले असतांनाच आता पुन्हा या शासकीय गायरान जमीनीच्या भुखंडावर वक्र दृष्टी करणाऱ्या काही भुखंड माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढीत या गोरगरीबांना उठवण्याचा डाव खेळण्यास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी या प्रकरणी कायमचा तोडगा काढून त्यांचे उघड्यावर येणारे संसार वाचवावे अशी मागणी होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या