💥जिंतूरात टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात तरूणांचा जागीच मृत्यु तर घटनेत अन्य एक युवक जखमी...!


💥जालना रस्त्यावरील पहिल्या पुलाजवळ दोन युवकांवर सात ते आठ जनांनी केला धारदार शस्त्राने हल्ला💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर शहराजवळील बलसा रस्त्यावरील पहिल्या पुलाजवळ सात ते आठ युवकांनी गुरुवारी (दि.14) सायंकाळी 5.30 च्या सुमारास धारदार शस्त्रास्त्राने केलेल्या हल्ल्यात एक युवक जागीच मृत्यू पावला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.


          जालना रस्त्यावरील पहिल्या पुलाजवळ सात ते आठ युवकांनी धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा (वय 21) व सोमेश विलास थिटे हे दोघे युवक गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अफोरोज बेग यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. तर सोमेश यास प्राथमिक उपचार करीत परभणी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकडे हलविले आहे.


          दरम्यान, येथील रुग्णालयात डॉक्टर तात्काळ उपलब्ध न झाल्याने जमावातील काही युवकांनी रुग्णालयातील फर्निचरची तोडफोड केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव वाढला होता. उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावून आले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या