💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे वाढदिवसा निमित्त जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण...!


💥येथील प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड व माणिक आवरगंड यांच्या वाढदिवसा निमित्य करण्यात आले वृक्षारोपण💥

पुर्णा (दि.२१ जुलै) : पूर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतीशील शेतकरी तथा पत्रकार जनार्धन आवरगंड व माणिक आवरगंड यांच्या वाढदिवसा निमित्य काल बुधवार दि.20 जुलै 2022 रोजी जिल्हा परिषद शाळा माखणी येथे आगळ्या -वेगळ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक उपक्रम म्हणून गावातील शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. 


यावेळी वाढदिवसानिमित्त दोघांनीही आपापले वेगळे वृक्ष आणून त्याची शाळेच्या प्रांगणात लागवड केली वाढदिवसानिमित्त शाळेतील  गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वर्षभर होमवर्क साठी लागणा-या वह्यासाठीचा खर्च जनार्धन आवरगंड यांनी देण्याचा निर्धार केला.या माध्यमातून त्यांनी  विद्यार्थ्यांना मदत करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.व इतरांनीही ईतर खर्च न करता असे उपक्रम राबविले तर गावांचा व शाळेचा विकास होईल या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जोशी , राजकुमार ढगे  ,सुरज पौळ  .राम महाजन , सुनिल शेळके ज्योती,झटे , पलमपली देविदास, मुंजा आवरगंड,  माजी सरपंच नेमाजी गाडे, राम आवरगंड .शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची आधी उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या