💥जिंतूर शहरातील महिला डॉक्टर सांगळे शसस्त्र हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी फरार....!


💥सहआरोपी राजेंद्र कांदे पोलिसांच्या ताब्यात मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार  : उधार दिलेले पैसे का मागीतले म्हणून केला हल्ला💥

जिंतूर प्रतिनिधी  /बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.२६ जुलै) - येथील महिला डॉ.ज्योती सांगळे यांच्यावर भरदिवसा जिवघेणा चाकू हल्ला करणारे आरोपी निष्पन्न झाले असून या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सोनवणे हा अद्यापही फरार असून या प्रकरणातील सह आरोपी राजेंद्र पांडुरंग कांदे यास पोलिसांनी काही अवघ्या काही तासाच्या आतच सिताफीने अटक केली आहे.

संपूर्ण जिंतूर शहरासह तालुक्यात खळबळ माजवणाऱ्या महिला डॉक्टर खुनी हल्ला प्रकरणातील हल्लेखोराने फिर्यादी डॉक्टर कडून काही दिवसांपूर्वी २० हजार रुपये उधार घेतले होते सदरील रक्कम परत मागितल्याच्या राग मनात धरून मुख्य आरोपी संतोष सोनवणे व त्याचा नातलग राजेंद्र पांडुरंग कांदे वय ३३ वर्ष राहणार मोंढा परिसर जिंतूर या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले होते. त्यापैकी मुख्य आरोपी संतोष सोनवणे हा अद्यापही फरार आहे व व राजेंद्र कांदे यास काही तासातच पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी जिंतूर पोलिसात नंबर 298/ 22 नुसार गुन्हा दाखल झाला असून कलम 307 452 ३४ माधवीप्रमाणे गुन्हा नोंद झाला असून याबाबत जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांचे मार्गदर्शनाखाली हा.पो. निरीक्षक श्री कोकाटे व सहकारी अधिक तपास करीत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या