💥पुर्णेत आर्य वैश्य समाजाच्या वतीने भाजपा नेते मा.मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त वृक्षारोपण...!


💥या प्रसंगी हभप.सोपान महाराजांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले💥पूर्णा (दि.30 जुलै) - पुर्णा शहरात आज शनिवार दि.30 जुलै 2022 रोजी राज्याचे माजी अर्थमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आर्य वैश्य समाजबांधवांच्या वतीने काही नारळाचे व बहुसंख्य कणेरीचे वृक्षारोपण करण्यात आले.


या प्रसंगी सोपान महाराजांनी  श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगितले.पर्यावरणाला पुरक असा उपक्रम समाजबांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आर्य वैश्य समाज पदाधिकारी श्री वसंतराव पापंटवार जिल्हा सहसचिव,श्री प्रभाकर कोत्तावार तालुकाध्यक्ष, श्री रमेश कोत्तावार कोषाध्यक्ष,श्री विजय रुद्रवार,श्री गोविंद नलबलवार, श्री नरहरी रुद्रवार, श्री सुमित कोत्तावार, श्री सौरभ कोत्तावार, श्री अतिष येरमवार, श्री ओंकार नाव्हेकर, श्री किशोर कोलपेकवार, श्री प्रकाश पोकळे, श्री नितिन चिद्रवार,श्री आशिष रुद्रवार, श्री सचिन डूब्बेवार,श्री ऋषिकेश डूब्बेवार,श्री रुपेश कोत्तावार ,श्री सतिश टाकळकर, श्री सोपान महाराज बोबडे, श्री सुभाष ओझा, श्री तवर सर,श्री नितिन बोबडे, श्री बालासाहेब बोबडे,श्री आबनराव पारवे यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले.समाजबांधवांनी झाडांना 14 ट्रिगार्ड देऊन त्यांचं संगोपन होईल याची काळजी घेतली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या