💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातीच्या महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “ते शिवसैनिक नाही तर दगाबाज💥

✍️ मोहन चौकेकर 

* मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी काढली ; 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित 

*आंतरराष्ट्रीय कर्ज अ‍ॅप फसवणुकीचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश;* 14 आरोपींना अटक

* 'तुमच्यावर लोकं पाळत ठेवून'; खासदार नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र; सरकारी अधिकाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती

* देशात 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली

* उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका, म्हणाले “ते शिवसैनिक नाही, तर दगाबाज…”*उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल

* टीव्ही बघण्याच्या नादात उंदरांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी टॉमेटो खाल्ल्याने महिलेचा मृत्यू शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. इतर नातेवाईकांच्या जबाबातही त्यांनी कोणताही संशय व्यक्त केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

* पुणे : अनोळखी तरुणीशी ओळख तरुणाला पडली महागात ; ६७ लाखांची खंडणी उकळणारे गजाआड दोन सराइतांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

* कल्याण : राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली, कुटुंब रंगलय नगरसेवक होण्यात आगामी पालिका निवडणुकीसाठीचे सर्वसाधारण महिला, नागरिकांच्या मागास प्रवर्गासहचे एकूण ४४ प्रभागांमधील आरक्षण शुक्रवारी पालिका निवडणूक आयोगाने सोडत पध्दतीने जाहीर केले.

* “राज्यातील जनतेच्या हिताचे सरकार संजय राऊतांमुळेच”; नवनीत राणा यांचा खोचक टोला गेल्या काही दिवसांपासून राज्यात राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्या संघर्ष सुरू आहे.

* ठाणे जिल्ह्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राज्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

* नागपूर : ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाची पंतप्रधान कार्यालयकडे तक्रार कामठी रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये होते परीक्षा केंद्र

* औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची घडी बसविण्यात सत्तार यांचा पुढाकार अर्जुन खोतकर यांची अब्दुल सत्तार यांनी समजूत काढली असून खोतकर आणि माजी मंत्री सुरेश नवले सिल्लोड येथे होणाऱ्या मेळाव्यात जाहीर प्रवेश करणार आहेत.

* ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर १० ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल घाटकोपर- ठाणे या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या ठाणे शहरात सुरू आहे.

* उल्हासनगर : खड्ड्यांनंतर आता रस्त्यांची धुळधाण ,* पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावर धुळीचा साम्राज्य पावसामुळे खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत होती.

* “मी ज्योतिषी नाही, पण निवडणुका…” विरोधकांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवार यांचे महत्त्वाचे विधान राज्यात सध्या शिंदे -भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे

* चंद्रपूर : माजी नगराध्यक्ष जयस्वाल राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत, पवारांच्या वागणुकीमुळे दुखावले काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात अजित पवार यांनी जयस्वाल यांना खडे बोल सुनावले.

* DHFL Yes Bank Case : अविनाश भोसलेंनी लंडनमध्ये ३०० कोटींची संपत्ती खरेदी केली ; CBI च्या आरोपपत्रात उल्लेखपु ण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत.

* “जगाच्या तुलनेत भारतात ७५ टक्के वाघ ; वन्यजीवांचे कार्यक्रम यापुढे प्रत्यक्ष ‘फिल्डवर’ घ्या” केंद्रीय मंत्री भुपेंदर यादव यांचे चंद्रपूर येथे जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

* टीम इंडियाच्या अडचणीत भर ; केएल राहुल वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर.                                      

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या