💥पुर्णा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तुटला अनेक गावांचा संपर्क : नदीला आलेल्या पुरात अडकली वानर सेना....!


💥वानर सेनेच्या बचावासाठी पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे यांनी पूरग्रस्त मदत केंद्रास साधला संपर्क💥 


पूर्णा (दि.१४ जुलै) - तालुक्यात मागील पाच ते सहा दिवसापासून सातत्याने जोरदार पाऊस चालू असल्यामुळे तालुक्यातील मौजे आहेरवाडी,वडगाव,कोनाथा,कान्हेगाव,निळा,पांगरा,लोहगाव अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहेरवाडी ते पूर्णा रोडवरील नदी /ओढा एक झाल्याने रोडवर पाण्याची पातळी वाढल्याने या गावाचा संपर्क तुटला असून जोरदार झालेल्या पावसामुळे नदी काठाच्या झाडावर बसलेली वानर सेना पुरात अडकल्याने वानर सेना पाणी कमी होण्याची वाट पाहत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

पुरात अडकलेल्या वानर सेनेच्या मदती साठी व त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे यांनी विशेष प्रयत्न करीत त्यांनी पूरग्रस्त मदत केंद्रास संपर्क साधला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या