💥एचएआरसी संस्थे तर्फे 50 एचआयव्ही ग्रस्त बालकांना मल्टिव्हिटॅमिन व कॅल्शियम टॉनिक औषधीचे वाटप....!


💥पोषक आहार व वापरविषयी जनजागृती सोबत हिमोग्लोबिन वाढी साठी मल्टिव्हिटॅमिन व आयर्न टॉनिक औषधीचे वाटप💥 

परभणी : (दि.27 जुलै) - एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजारग्रस्त बालकांना संधी साधू आजारापासून बचावासाठी  पोषक आहार सोबत, हिमोग्लोबिन वाढी सोबत कॅल्शियम, आयर्न, मिनरल आदी घटकांची योग्य मात्र आवश्यक आहे. ते नसेल तर ऍनिमिया अर्थात पंडुरोग सारख्या आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी एचएआरसी संस्था पोषक आहार व वापरविषयी जनजागृती सोबत  हिमोग्लोबिन वाढी साठी मल्टिव्हिटॅमिन व आयर्न टॉनिक औषधीचे वाटप करत असते. 

आज  दि 27 जुलै बुधवार रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेतर्फे जिथे एचआयव्ही ग्रस्त बालके व मातांना एआरटी औषधोपचार मिळतो' अशा एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय च्या वैद्यकीय अधिकारी डॉ सौ मंजुषा कुलकर्णी मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.  ही औषधी पुढे एआरटी विभागात उपचार घेणाऱ्या व पोषण अर्थात न्यूट्रिशनची आवश्यकता असलेल्या एचआयव्ही ग्रस्त बालके व मातांना वाटप करण्यात येतील. 

या उपक्रम निमित्त एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले "कुपोषण , कमी वजन असणे शिवाय अपुरा पोषक आहारामुळे एचआयव्ही एड्स सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त 0 ते 18 वयोगटातील  बालके अनेक वेळा संधी साधू आजारांना बळी पडतात. अशा वेळी मुलांना कॅल्शियम, लोह, प्रथिनयुक्त पोषक आहाराची गरज असते.  म्हणून  एचएआरसी संस्था तर्फे 50 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यासाठी जवळपास आठ हजार किंमतीची मल्टिव्हिटॅमिन व कॅल्शियम टॉनिक औषधीचे एआरटी विभागाकडे  सुपूर्द करत आहोत"

इंफियस हेल्थकेअर ची  सामाजिक बांधिलकी: या उपक्रमासाठी बेकॉन हेल्थकेअर च्या महेश पाटील पाटील यांनी जवळपास 8 हजार किंमतीची मल्टिव्हिटॅमिन व कॅल्शियम  टॉनिक औषधी एचएआरसी संस्थेकडे डोनेट केली. जी आज 50 एचआयव्ही ग्रस्त बालकांना वाटप करण्यात आली. 

या प्रसंगी एआरटी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी, डॉ नीलिमा मार्डीकर, अनुराधा बर्डे, सुरेखा जाधव व सर्व स्टाफ ची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी  एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, रितेश कालानी, राजेश्वर वासलवार,महेश पाटील यांनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या