💥जिंतूर-परभणी महामार्गावर एकाच दिवशी 4 हजार 120 वृक्ष लागवड....!


💥यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी, (दि.25 जुलै) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत जिंतुर-परभणी महामार्गाच्या दुतर्फा आज जिंतूर तालुक्यातील जिंतूर, बोरी, पांगरी, चांदज, कोक आदी महामार्गावरील एकाच दिवशी 4 हजार 120 वृक्ष लागवड करण्यात आली.


            यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल कोटेचा, उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची उपस्थिती होती.

            राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य प्रकल्पासाठी वृक्ष तोडली जातात. या वृक्षांच्या प्रमाणात दुसरी नवीन वृक्ष लावण्याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.  तापमान वाढ, पाणी टंचाई, अशा संकटांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे.  वृक्ष लागवडी सोबतच वृक्ष संवर्धन करणे देखील अत्यंत महत्वपूर्ण असून नागरिक आणि विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे. असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात रत्याच्या कडेला सात मिटरवर एक वृक्ष लावण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            भारतीय राष्ट्रीय राजमार्ग  प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल कोटेचा म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केली जाणारी वृक्ष लागवड पर्यावरण संतुलन कायम करण्यासाठी असून यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे. 

            पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली असून, यामुळे प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून  जिल्ह्यातील परभणी-जिंतूर या( एन.एच. 552 के) महामार्गावर 4 हजार 120  वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीकरिता जिंतूर येथील शालेय शिक्षक, विद्यार्थी, नॅशनल कॅडेट कोरचे विद्यार्थी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल कोटेचा व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी या वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी झाले.

* धर्मापुरी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न :-

            धर्मापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड मोहिमेनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीसाठी वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, सामाजिक वनीकरणाचे श्री.जोशी, तहसिलदार संजय बिराजदार यांच्यासह जिल्हा परिषदेचे शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.       


                                                                        -*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या