💥नांदेड येथील रेल्वेस्थानकावरुन 16 व 23 जुलै रोजी तिरुपतीस विशेष साप्ताहिक एक्सप्रेस धावणार....!


💥जास्तीत जास्त भक्तांनी याचा फायदा घ्यावा जेणेकरून रेल्वे नियमित करणेसाठी सोयीचे होईल - मोतीलाल डोईफोडे 

परभणी (दि.15 जुलै) :  नांदेड येथील रेल्वेस्थानकावरुन 16 व 23 जुलै रोजी तिरुपतीस विशेष साप्ताहिक एक्सप्रेस धावणार आहे.

          गाडी क्रमांक 07633 हि गाडी दिनांक 16 जुलै आणि 23 जुलै, 2022 रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड मार्गे उदगीरला सायंकाळी 5 ला पोहचले. तेथून भालकी, बिदर, अहीराबाद, विकाराबाद, तांदूर, मेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुटफळ, गुती, तादिपात्री, गुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी 08.30 वाजता पोहोचेल.

          गाडी क्रमांक 07634 हि गाडी दिनांक 17 जुलै आणि 24 जुलै, 2022 रोजी रविवारी रात्री 9.00 वाजता तिरुपती रेल्वेस्थानकावरुन सुटेल आणि आलेल्या मार्गानेच उदगीरला सकाळी 10:30 वाजता तर नांदेडला सायंकाळी 5:20 ला पोहचेल. या रेल्वेच्या फक्त दोन फेर्‍या मंजूर असून जास्तीत जास्त प्रवाश्यानी, भक्तांनी याचा फायदा घ्यावा. जेणेकरून रेल्वे नियमित करणेसाठी  सोयीचे होईल, असे मत दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य मोतीलाल डोईफोडे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या