💥सेनगाव तालुक्यातील बामणीत किडनी आजार (मूत्र आजाराने) : 10 ते 15 ग्रामस्थ या आजाराने त्रस्त....!


💥राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने देण्यात आले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगाव तालुक्यातील बामणी येथील ग्रामस्थ मूत्र विकाराचा व किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत या संदर्भात त्याची तात्काळ तपासणी शिबिराचे आयोजन करून तपासणी करावी अशी मागणी आज दि 22/07/2022 रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सेनगाव यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे 


हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मराठवाड्यात आणि विदर्भातीच्या सीमेवर बामणी हें गाव आहे या गावांतील लोकसंख्या जवळपास 600ते 700 आहे हें गाव कापडशिंगि psc अंतर्गत येते  बामणी या गावातील 10 ते 15 ग्रामस्थ सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत या पुर्वी देखिल या गावातील 10 ते 12 ग्रामस्थाचा या आजाराने मृत्यु झाला आहे त्यामुळे आत्ता आरोग्य विभागाच्या वतीने आत्ता तत्काळ शिबिर घेऊन गावातील ग्रामस्थाच्या तपासण्या करून त्याना योग तो उपचार करावी जने करून काही जीवितहानी होणार नाही असे निवेदन सेनगाव राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले आहे आत्ता आरोग्य विभाग काय उपाय योजना करणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या