💥जिंतूर तालुक्यातील चार कुटुंबांनी चीमुकल्यासह कळसुबाई शिखर सर केले....!


💥कळसुबाई शिखर समुद्रसपाटीपासून 1 हजार 646 मीटर म्हणजे 5 हजार 400 फूट उंचीवर आहे💥

जिंतूर प्रतिनिधी : बी.डी.रामपूरकर

तालुक्यातील चारठाणा येथील कार्यरत असलेले पोलिस नायक शिवदास सूर्यवंशी  अस्मिता मोरे महाराष्ट्र पोलीस जोडी त्यांच्या सोबत दोन मुलींसह व तसेच डॉक्टर देव कराळे व त्यांची पत्नी मीरा कराळे आणि त्यांचे दोन मुले त्याचबरोबर अनुप सोळुंके शिक्षक व त्याची पत्नी नमिता सोळंके शिक्षिका व शिक्षिका व त्याचा मुलगा रुद्र तसेच पंडित टाफॅ शिक्षक त्याची पत्नी आयोध्या टाफॅ यांनी राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर दि 21 जून रोजी केले. त्याबद्दल यांचे स्वागत करण्यात येत आहे.


  रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी न चुकता ही कुटूंबातील मुले,  मुलींसह तालुक्यातील पर्वतावर असलेली देवस्थाने, पर्यटन स्थळ, तसेच धरणक्षेत्र आदी ठिकाणी भेट देऊन वनभोजन करून सुट्टी साजरी करतात अगदी कोरोना काळातही सर्व नागरिक रोगाच्या भीतीने घरात बसलेली असताना शिवदास सूर्यवंशी व मीना सूर्यवंशी हे त्यांच्या दोन्ही मुलींसह  निसर्गाच्या सानिध्यात बिनधास्त फिरत असतात तालुक्यातील सर्वच  ग्रामीण भागातील दुर्गम ठिकाणी असलेली देवस्थाने धबधबे धरण व या कुटुंबाने पालथी घातली आहेत .आता त्यांनी सोमवारी 21जून रोजी  राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर केले. हे शिखर समुद्रसपाटीपासून 1 हजार 646 मीटर म्हणजे 5 हजार 400 फूट उंचीवर असून सह्याद्री पर्वतरांगेतील पश्चिम घाटात आहे. या पर्वतावर चढत असताना वन्य प्राणी तसेच वनौषधी दुर्मिळ फुले वनस्पती आढळून येतात. या भागात  महादेव कोळी व आदिवासी समाज बांधव राहतात .त्यांच्या मुख्य व्यवसाय भात शेती असून शिखराच्या पाठावर एक जुनी विहीर आहे. सूर्यवंशी कुटुंबाने कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल त्यांचे जिंतूर तालुक्यातील प्रेस क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले .प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख,दिलीप देवकर. गुलाबराव शिंदे आदींनीही स्वागत केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या