💥शिवसेनेचचे अर्धशतकासह अर्ध दशक पार : शिवसेना स्थापणेला ५६ वर्षे पुर्ण...!


💥शिवसेना ही संघटना नाहीच तर तो एक अमरत्व प्राप्त झालेला विचार :- देवा पाटील

जीचा जन्मच संघर्षातुन झाला ती शिवसेना.मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी,भुमिपुत्रांच्या रोजगारासाठी, मराठी अस्मितेसाठी, अखंड महाराष्ट्रासाठी, प्रखर हिंदुत्वासाठी, जनतेच्या सेवेसाठी ती जन्माला आली.अन्यायाविरूद्ध आवाज उठवायची, गोरगरिबांसाठी रस्त्यावर उतरायची आणि तिचा सेनाप्रमुख आपल्या विचारातुन मराठी माणुस पेठवायचा आणि तोच मराठी माणुस ज्वालामुखी बनुन प्रस्थापितांना अंगावर घ्यायचा.सत्ताधारी पक्षाच्या बुडाला आग लावण्याची शक्ती शिवसैनिक नावाच्या ज्वालामुखीत आली.लोकासाठी झगडणारी संघटना कधी राजकारणात पाऊल उचलेल आणि तेच पाऊल सत्तेवर असेल असे शिवसेनाप्रमुखांना कधी वाटलेच नसेल पण कडव्या, निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर हे शक्य झाले.

गल्लीतली संघटना दिल्लीच्या तख्ताला हादरे देवु लागली तेव्हा ही संघटना बरखास्त करा,या संघटनेवर बंदी आणा अशा चर्चा रंगु लागल्या पण सत्याचा मार्गावर चालणारी, जनहित जोपासणारी, हिंदुत्वाचा हुंकार असलेली संघटनेवर बंदी घालणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे असेच.गेल्या ५६ वर्षात शिवसेनेने अनेक चढ-उतार बघितले त्यातुनच ती तेजस्वी,ओजस्वी झाली आणि न्याहाळुन गेली.या संघटनेत लहानाचे मोठे झालेले आईसमान शिवसेनेशी गद्दार झाले, फितुर झाले आणि शिवसेनेला संपवण्याच्या वल्गना करु लागले.शिवसेना संपवता संपवता असे कित्येक संपले हे संपुर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे.शिवसेना जर एखाद्याला बाजारात आणु शकते तर त्याचा बाजारही उठवु शकते.

विरोधकांना,गद्दारांना,फितुरांना शिवसेना कधीच संपणार नाही कारण शिवसेना ही संघटना नाहीच तर तो एक अमरत्व प्राप्त झालेला विचार आहे आणि विचार कधीच संपत नसतो.गेल्या ५६ वर्षात शिवसेना ही जनतेच्या मनात घर करून बसली आहे.सत्ता नसताना न्यायासाठी झगडणे आणि सत्ता आल्यानंतर जनतेच्या विकासाची,संरक्षणाची,आरोग्याची,शिक्षणाची,रोजगाराची, महिला सक्षमीकरणाची वाट चालणे ही शिवसेनेची पद्धत आहे.जोपर्यंत निष्ठावंताची फौज शिवसेनेच्या पाठीशी आहे तोपर्यंत शिवसेना हे नाव मिटवण्याचे स्वप्ने कोणी पाहुच नयेत.संघर्षाची किनार असलेली, त्यागाची भावना असलेली,निष्ठेचा खजिना असलेली शिवसैनिक नावाची संपत्ती हेच शिवसेनेचे शक्तीकेंद्र आहे.

जय महाराष्ट्र!!

आपला संघर्ष योध्दा देवा पाटील.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या