💥पुर्णा तालुक्यातील मिठापूर रेती स्थळावर आयपीएस अधिकारी तथा प्रभारी एसडीपीओ श्रेणीक लोढा यांच्या पथकाची धाड....!


💥नियमांची पायमल्ली करणाऱ्या रेती धक्का चालक पौळला जबरदस्त चोप : १ कोटी ८८ लाख १६७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.०६ जुन २०२२) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या सारंगी-मिठापूर अधिकृत रेती धक्क्यावर मनमानी पध्दतीने शासकीय नियमांची राजरोसपणे पायमल्ली करीत तब्बल चार पोकलेन मशीनच्या साह्याने प्रचंड प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करणाऱ्या संबंधित रेती धक्क्यावर परभणी जिल्हा पोलिस दलातील धाडसी कर्तव्यकठोर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा गंगाखेड विभागाचे एसडीपीओ श्रेणीक लोढा यांनी व पथकातील सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करीत संबंधित रेती धक्का लिलावधारक हनुमंत पौळ याला चांगलाच चोप देत ४ पोकलेन मशीन,९ हायवा ट्रक,२ स्कार्पीओ गाड्या,१४ मोबाईल,३ लाख ४४ हजार ७०० रुपयें असा एकून १ कोटी ८८ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची अत्यंत धाडसी कारवाई काल रविवार दि.०५ जुन २०२२ रोजी दुपारी ०१:१० ते ०४:०० वाजेच्या सुमारास केल्याने तालुक्यातील रेती माफीयांमध्ये खळबळ माजली आहे.

 सारंगी मिठापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रातील अधिकृत मिठापूर रेती धक्का चालक हनुमंत मनोहरराव पौळ या रेती धक्का परवानाधारकाने गोदावरी नदीपात्रात व पात्रा बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर गोदावरी नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अर्थळा निर्माण करून प्रवाह बदलून पोकलेन मशीनने अवैधपणे नदीपात्रात फिरून पाणी दुषीत केले तसेच शासनाने ठरवून दिलेल्या आटी व शर्थींचा भंग करून प्रवाहा बाहेर अवैध रेतीचे प्रचंड प्रमाणात उत्खनन शासकीय नियमांची पायमल्ली करीत शेतीसाठी लागणाऱ्या तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतांना ही संबंधित रेती धक्का लिलाव धारकाने तसे अवैध कृत्य केले व नदीपात्रात असलेली शासकीय रेती चोरी करण्याच्या उद्देशाने नदीपात्रातील ठराविक क्षेत्र सोडून नदीपात्रात घुसून गौण खनिज उत्खनन संबंधित शासकीय नियमाचे उल्लंघन करून पोकलेन मशीनच्या साहाय्याने गोदावरी नदीपात्रातील रेतीचे अवैधरित्या उत्खनन करीत असतांना रंगेहात प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा गंगाखेड विभागाचे एसडीपीओ श्रेणीक लोढा यांनी व पथकातील सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळून आल्यामुळे या संदर्भात तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकात पोहेकॉ.सुर्यकांत भगवानराव केजगीर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी हनुमंत मनोहरराव पौळ रा.फळा ता.पालम,माऊली घोरपडे,संदिप ढगे रा.कंठेश्वर ता.पुर्णा,जिया खान पठाण,लिंबाजी तुळसीराम आव्हाड रा.सायाळा ता.पालम, या पाच जनांवर आज सोमवार दि.०६ जुन रोजी गुरनं.९१/२२ कलम ३७९,४३०,४३१,१८६,१२०(ब) ३,४ भादवीसह कलम महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ कलम ४८ (७) (८) पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ३,१५ (१) (२) खाणी व खनिज अधिनियम १९५७ चे कलम २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास चुडावा पोलिस स्थानकाचे सहा.पो.नि.बाचेवाड हे करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या