💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - पुर्णा शहर लोकल न्युज अपडेट्स.....!


💥पुर्णा येथील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील शासकीय स्वस्त धान्य गोदामात धाडसी चोरी💥

१) पुर्णा येथील पुर्णा-पांगरा ढोणे मार्गावरील शासकीय स्वस्त धान्य गोदामात आज रविवार दि.२६ जुन रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी परिसरातील धान्य पुरवठा करणाऱ्या शासकीय वाहन ट्रकचे जिपीएस बंद करून गोदामाचे सिल/कुलूप तोडून केली गोदामातील शेकडो क्विंटल शासकीय स्वस्त धान्याची चोरी घटनास्थळावर तहसिलदार टेमकर यांची पोलिस पथकाला सोबत घेऊ भेट : गुन्हा दाखल न करता प्रकरणावर पडदा टाकल्या जाण्याची शक्यता ?

२) पुर्णा शहरातील व्यापार पेठेत शुकशूकाट ग्राहकांची वर्दळ नसल्यामुळे व्यापाऱ्यांवर अक्षरशः माशा मारण्याची वेळ अनेक व्यापारी इतरत्र स्थलांतर करण्याच्या मुड मध्ये...

३) पुर्णेत मागील आठ दावसापासून आयडीया-वोडाफोन (व्हिआय),एअरटेल,जिओ,बिएसएनएल कंपन्यांचा लपंडाव नेटवर्क गुल ; सिमकार्ड धारक त्रस्त संबंधित कंपन्यांकडून सिमकार्ड धारकांचे आर्थिक मानसिक सोशन....

४) पुर्णा शहरातील रेल्वे लोहमार्गा खालील भुयारी मार्गात पावसामुळे पाणी साचत असल्यामुळे सदरील मार्ग झाला वाहन धारकांसाठी धोकादायक : पुर्णा-नांदेड मार्गावरील हिंगोली-नांदेड गेटवर मागील तिन वर्षापासून रेल्वे उड्डाण पुलाचे काम चालू असल्यामुळे पुर्णा-नांदेड,पुर्णा-ताडकळस मार्गांना तसेच लोहमार्गा पलिकठील वसाहतींना शहराशी जोडणारा हा एकमेव रेल्वे भुयारी मार्ग....

५) पुर्णा तालुक्यातील मौ.गौर येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश जोगदंड यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड : प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान....

६) पुर्णा शहरातील जुना मोंढा परिसर वगळता शहरात कुठेही सार्वजनिक स्वच्छता गृह/मुताऱ्या नसल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची तारांबळ....

७) पुर्णेत उज्ज्वला गॅस योजनेचा बट्ट्याबोळ : उज्ज्वला गॅस योजनेतील सिलेंडरचा हॉटेल चालक/हातगाड्यांवरील खाद्य पदार्थ विक्रेते करताय खुलेआम वापर...

८) पुर्णा नगर परिषद प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी बेनर/पोस्टर लावण्यास प्रतिबंध ? शहरात लावलेले वाढदिवसाचे बेनर केले जप्त....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या